Marathi Bhasha : १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 14, 2022 | 04:08 IST

Marathi language conservation fortnight : महाराष्ट्र शासनाच्यावतीने शुक्रवार १४ जानेवारी ते शुक्रवार २८ जानेवारी २०२२ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाईल. या पंधरवड्याची सुरुवात मकरसंक्रांतीच्या दिवशी होत आहे.

Marathi language conservation fortnight
१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 
थोडं पण कामाचं
  • १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
  • पंधरवड्यात भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
  • कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार

Marathi language conservation fortnight : मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने शुक्रवार १४ जानेवारी ते शुक्रवार २८ जानेवारी २०२२ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाईल. या पंधरवड्याची सुरुवात मकरसंक्रांतीच्या दिवशी होत आहे. पंधरवड्यात भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी  आणि वाचनसंस्कृती, भाषा आणि जीवन  यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.

दि. १४ जानेवारी - साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी  संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात  श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या  अध्यक्षस्थानी भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर या असतील, प्रास्ताविक  नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी अकरा ते दुपारी एक या दरम्यान होणार आहे.

दि. १७ जानेवारी - मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष  महेश दत्तात्रय लोंढे  असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत.  सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.

दि. १८ जानेवारी - आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते – अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन – प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक – भारत जाधव करणार आहेत.

दि. १९ जानेवारी - आभासी व्याख्यान – मी काय वाचतो? या विषयावर  वक्ते  नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक – भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

दि. २० जानेवारी - आभासी व्याख्यान- प्रशासनात मराठी भाषेचे उपयोजन वक्ते – विजया डोनीकर, भाषा संचालक, आयोजक – संत गोन्साल्वो महाविद्यालय, वसई, अध्यक्ष : सोमनाथ विभुते, प्राचार्य, प्रास्ताविक- संतोष गोसावी

दि. २१ जानेवारी - आभासी चर्चासत्र-  शालेख विद्यार्थी आणि वाचन संस्कृती, आयोजक श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. सहभाग – दीपा देशमुख, पुणे, सुरेश सावंत, नांदेड, नामदेव माळी, सांगली, रमेश पानसे, अध्यक्ष -विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक -डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन – प्रा.राजश्री कुलकर्णी

दि. २४ जानेवारी - व्याख्यान -मुखी माझ्या रमो माय मराठी, प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी, चेतना महाविद्यालय, वांद्रे आयोजक. अध्यक्ष- श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गांगण. आभार प्रकटन भारत जाधव

दि. २५ जानेवारी - व्याख्यान- भाषा आणि जीवन. वक्ते -डॉ. संतोष बोराडे, स्थळ- महात्मा गांधी विद्यालय, वांद्रे (पूर्व), अध्यक्ष -श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गांगण, आभार प्रकटन -संतोष गोसावी

दि. २७ जानेवारी - भासी चर्चासत्र (फेसबुक लाईव्ह) मराठी विद्यापीठ कसे असावे ? आयोजक -विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी जि. सोलापूर. वक्ते : लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. रणधीर शिंदे,  श्रीपाद भालचंद्र जोशी,  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (अध्यक्ष), संवादक – डॉ. महेंद्र कदम, अध्यक्ष : श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक – भारत जाधव

दि. २८ जानेवारी - समारोप - साहित्य अभिवाचनाने समारोप होणार आहे. यात भाषा संचालनालय येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. अध्यक्ष -श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक संतोष गोसावी करतील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी