मुंबईतील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 13, 2023 | 13:00 IST

मुंबईमधील जोगेश्वरी पश्चिम विभागात असलेल्या ओशिवरा फर्निचर मार्केटमधील दुकाना भीषण आग लागली आहे. सकाळी 11 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.आग लागल्याची माहिती मिळताच  अग्निशामक दल आणि पोलीस दल घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे. 

Massive fire at Mumbai's Oshiwara Furniture Market
मुंबईतील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ओशिवरा फर्निचर मार्केटमधील दुकानामध्ये भीषण आग लागली आहे.
  • अग्निशामक दल आणि पोलीस दल घटनास्थळी पोहचले आहे.
  • कोणतीच जीवित हानी झालेली नसल्याची माहिती मिळली आहे.

मुंबई :  मुंबईमधील जोगेश्वरी पश्चिम विभागात असलेल्या ओशिवरा फर्निचर मार्केटमधील दुकानामध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी 11 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलीस दल घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे. 

अधिक वाचा  : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 300 रुपयांचा बोनस

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून पाच अग्निशामक दलाच्या गाड्या, पाच मोठे पाणी टॅकर, आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात आहेत. अद्याप कोणतीच जीवित हानी झालेली नसल्याची माहिती मिळली आहे. परंतु दुकानांचे आर्थिक नुकसान मोठं झालं आहे. ओशिवारा येथील फर्निचर मार्केटमधील एका दुकानात ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी