पोरांनो ऐकलं का ! मास्तर शाळेत पाच दिवस नसणार; पण का असेल गुरुजींची सुट्टी?, वाचा कारण

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 14, 2023 | 22:49 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे (Maharashtra State Primary Teachers Association) राज्य स्तरीय अधिवेशन (State level convention) रत्नागिरी (Ratnagiri) येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे.  तर 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व 19 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवस मास्तर सुट्टीवर असणार आहेत.

master will not be at school for five days
पोरांनो ऐकलं का ! मास्तर शाळेत पाच दिवस नसणार; पण का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे
  • राज्य स्तरीय अधिवेशन रत्नागिरी येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार
  • शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती जुनी पेन्शन योजनेवर होणार चर्चा

मुंबई : राज्यातील (maharashtra state) शाळेतील मास्तर (master) सलग पाच दिवस शाळेत राहणार नाहीत. ही हेडिंग वाचून जरा धक्का आणि वेगळं वाटलं असेल ना. पण हो तुम्ही जजे वाचलं ते बरोबर वाचलंय. आता तुम्ही विद्यार्थ्यांना (Student) प्रश्न पडला असेल नेहमी शाळेत या या म्हणणारे मास्तरचं सुट्टीवर का जात आहेत? (master will not be at school for five days; But why Guruji will not be in school, read the reason)

अधिक वाचा  :तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी

तर त्याचं कारण असं की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य स्तरीय अधिवेशन रत्नागिरी येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे या अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व 19 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवस मास्तर सुट्टीवर असणार आहेत.

अधिक वाचा  : तुमच्या या सवयी तुमच्या मुलांना बिघडू शकतात

मास्तर मंडळी जात असलेल्या या अधिवेशनात विविध समस्या, मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. या अधिवेशनात शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता, महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण, यांसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे.  

अधिक वाचा  : काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा बंद राहणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेकजण उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी