यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्री, केबलमॅन आणि M-TAI यांचा उल्लेख

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 07, 2022 | 20:16 IST

Matoshri, Cableman and M-TAI mentioned in Yashwant Jadhav diary : मुंबई मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या डायरीतील तीन उल्लेखांची सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते

Matoshri, Cableman and M-TAI mentioned in Yashwant Jadhav diary
यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्री, केबलमॅन आणि M-TAI यांचा उल्लेख  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्री, केबलमॅन आणि M-TAI यांचा उल्लेख
  • मातोश्री, केबलमॅन आणि M-TAI या तिघांसोबत अर्थपूर्ण व्यवहार
  • आयकर विभाग करत आहे चौकशी

Matoshri, Cableman and M-TAI mentioned in Yashwant Jadhav diary : मुंबई : मुंबई मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या डायरीतील तीन उल्लेखांची सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते. डायरीत मातोश्री या नावाचा उल्लेख असल्याचे आधीच जाहीर झाले आहे. मातोश्री व्यतिरिक्त केबलमॅन आणि M-TAI असेही दोन उल्लेख डायरीत आढळले आहेत. मातोश्री, केबलमॅन आणि M-TAI या तिघांसोबत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा दाट संशय आयकर विभागाला आहे.

आयकर विभागाने मार्च २०२२ मध्ये यशवंत जाधव यांच्या घरावर धाड टाकून जप्तीची कारवाई केली होती. कारवाई करताना आयकर विभागाने यशवंत जाधव यांची एक डायरी जप्त केली होती. या डायरीत सांकेतिक शब्दात काही व्यवहारांच्या नोंदी असल्याचे आयकर विभागाला प्रथमदर्शनी आढळले. यानंतर डायरीतील नोंदींची चौकशी करण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला. सध्या आयकर विभाग डायरीत नोंदविलेल्या मातोश्री, केबलमॅन आणि M-TAI यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डायरीतील पहिले दोन उल्लेख राज्य मंत्रिमंडळातील दोन व्यक्तींच्या संदर्भातले आहेत तर तिसरा उल्लेख हा मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या एका महिला नेत्याविषयीचा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी