मुंबई: शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडलेले बंडखोर आमदार (MLA)हे आता सातत्याने संजय राऊतांनाच (Sanjay Raut) टार्गेट करत आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच आपण बाहेर पडलो. असं हे आमदार आता एकमुखाने बोलू लागले आहे. बंडखोर आमदारांनी आपला पवित्रा बदलल्यानंतर संजय राऊत यांनी देखील दोन पावलं मागे जात एक नवा डाव टाकला आहे. \
सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या अग्रलेखात राऊतांनी असं नमूद केलं आहे की, जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ‘शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!’’ यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? असं म्हणत संजय राऊत यांनी एक प्रकारे आमदारांना अद्यापही परतीचे दोर कापलेले नाहीत असंच सुचवलं आहे.
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
अधिक वाचा: शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं!
अधिक वाचा: सोमय्या CMच्या भेटीला;यामिनी जाधव,सरनाईकांवरील ED पीडा टळली
अधिक वाचा: बंडखोरी केलेल्या शिंदे गटाचा नेमका फायदा काय?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.