Matoshri Inside Story: एकनाथ शिंदे, भाजपशी जुळवून घ्या, खासदारांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 11, 2022 | 22:27 IST

शिवसेना खासदारांची 'मातोश्री'वर जी बैठक पार पडली त्यात सर्वच खासदारांनी आपण भाजपसोबत जावं असा सूर आळवला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

matoshri inside story shiv sena should align with eknath shinde and bjp all mp clearly told uddhav thackeray
Matoshri Inside Story: एकनाथ शिंदे, भाजपशी जुळवून घ्या, खासदारांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं!  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर पार पडली बैठक
  • भाजपसोबत जाण्याचा सर्वच खासदारांचा सूर
  • भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवरील दबाव वाढला

मुंबई: शिवसेनेत सध्या खूपच वेगवान घडामोडी होत आहेl आणि ठाकरे सरकार कोसळल्यापासून तर पक्षात राहिलेले अनेक आमदार-खासदार हे अस्वस्थ आहेत. अशातच आज (11 जुलै) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' या आपल्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये या सर्वच खासदारांनी आपण एकनाथ शिंदे, भाजपशी जुळवून घ्यावं असं उद्धव ठाकरेंना स्पष्ट शब्दात सांगितलं. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

'मातोश्री'च्या बैठकीत Inside Story: 

शिवसेनेच्या सर्वच खासदारांचा आजच्या बैठकीत असा सूर होता की, आपण एकनाथ शिंदे आणि भाजपशी जुळवून घेतलं पाहिजे. कारण भाजपने देशात मोठी ताकद निर्माण केली आहे. आपल्याला आपला पक्ष भविष्यात वाढवायचा असेल तर आपल्याला या ताकदीसोबत पुढे जायला पाहिजे. 

एकनाथ शिंदे फुटून बाजूला गेले असले तरी आजही मनाने शिवसैनिक आहेत. शिवसेनेची विचारधारा घेऊन पुढे गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंशी जुळवून घेतलं तर पक्षासाठी हिताचं होईल.

अधिक वाचा: "थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि...." Aaditya Thackeray यांचं बंडखोरांना ओपन चॅलेंज

यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर एक प्रकारे दबाव वाढत आहे. दुसरीकडे खासदारांनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण की, एनडीएच्या बाजून सर्व खासदार तयार असताना संजय राऊत यांनी मात्र या बैठकीत अशी मागणी केली आहे की, आपण महाविकास आघाडीसोबत होतो. यामुळे यशवंत सिन्हा हे आपले उमेदवार असू शकतात. आपण त्यांना मतदान केलं पाहिजे. पण या गोष्टीला सर्व खासदारांनी विरोध केला. 

खासदारांनी आपलं मत भाजपसोबत जावं असं थेट उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. जर तसं झालं नाही तर हे बारा आमदार फुटण्याची शक्यता आहे. 

या सगळ्या चर्चेदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काहीही भाष्य केलं नाही. त्यांनी खासदारांचं ऐकून घेतलं आणि आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला. पण खासदारांचा वाढता दबाव पाहता उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा: Sanjay Raut: "जेव्हा स्वत:ला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते" शिवसेना नेते संजय राऊत यांचं खोचक ट्विट, बंडखोरांना टोला 

पाहा बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया 

'खासदार संजय जाधव आजारी आहेत, हेमंत पाटील हे देखील पोहचू शकले नाही. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आहे त्यामुळे कलाबेन डेलकर पोहचू शकलेल्या नाहीत. बाकी श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याविषयी मला तरी काही माहिती नाही. बाकी सगळे खासदार होते.' 

'राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत नक्कीच चर्चा झाली. दोन्ही बाजूने चर्चा झाली. द्रोपर्दी मुर्मू या आदिवासी महिला आहेत उमेदवार राष्ट्रपती पदाच्या त्यांच्याबाबत चर्चा झाली. यशवंत सिन्हांच्या बाबत चर्चा झाली. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणा पलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलं आहे. मग त्या प्रतिभाताई पाटील असतील किंवा प्रणव मुखर्जी असतील. असे निर्णय शिवसेनेने घेतले आहेत.' 

'या संदर्भात चर्चा झाली. सर्व खासदारांनी निर्णयाचे अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत. पक्षप्रमुख यांचा जो आदेश आहे कोणाला कसं मतदान करायचं हा सर्व खासदार आणि आमचे जे आमदार आहे त्यांच्यावर बंधनकारक आहे.' 

अधिक वाचा: फडणवीस बाजूला बसलेले असतानाच CM शिंदेंने दिले संजय राठोडांबाबत मोठे संकेत

'जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा निर्णय असतो त्याच्या बरोबर संजय राऊत असतात. त्यामुळे मी नाराज असं कोणी बातम्या चालवत असतील तर ते मूर्ख आहेत.' 

'शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आहे. दुसरी कोणाचीही नाही. त्यामुळे पदावर ठेवण्याचे आणि हटवण्याचे पूर्ण अधिकार हे पक्षप्रमुखांना आहेत. कोणाला असं वाटत असेल की, अधिकार नाहीत तर तो त्यांचा भ्रम आहे.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले. 

दरम्यान, आता या सगळ्या चर्चेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी