महापौर म्हणतात...उघड्या गटारांसाठी मुंबईकर जबाबदार

मुंबई
Updated Jul 11, 2019 | 21:00 IST

गोरेगावमध्ये एक चिमुरडा उघड्या गटारात पडून वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेनंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी मुंबईकरांनाच जबाबदार ठरवलं आहे. 

mayor vishwanath mahadeshwar
महापौर म्हणतात उघड्या गटारांसाठी मुंबईकर जबाबदार   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • महापौरांनी गोरेगावला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली
  • महापौरांनी घटनेचं खापर मुंबईकरांवर फोडलं
  • घटनेची चौकशी करून कारवाई करणारः महापौर

मुंबईः  गोरेगावमधल्या आंबेडकर नगर परिसरातल्या नाल्याच्या मॅनहोलमध्ये तीन वर्षांचा चिमुरडा पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेनंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. यावेळी महापौरांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर महापौरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत मुंबईकरांनाच जबाबदार धरलं आहे. 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तीन वर्षांचा चिमुरडा नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडल्याचं खापर मुंबईकरांवर फोडलं. मुंबईत अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरचं झाकणं काढत असतात, असा अजब दावा केला आहे.

महापौरांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलं की, दिव्यांशच्या आईनं त्याची काळजी घ्यायला हवी होती. तसंच गटारावरचं झाकण उघडं का होतं? स्थानिकांनी झाकणं तोडलं होतं का? प्रशासनानेच गटारावर झाकण बसवलं नव्हतं का? याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

 

पुढे मुंबईकरांवर खापर फोडतं महापौरांनी म्हणाले की, स्थानिक लोक अनेदका गटारे तोडतात. गटारांमध्ये कचरा टाकण्यासाठी स्थानिक लोकं गटारावरचं झाकण काढतात किंवा अनेकदा तोडतात सुद्धा. पालिकेकडून नेहमी विनंती करण्यात येते की, असे करू नका, मात्र लोकांकडून हे वारंवार होतं असतं. त्याचीच पुनरावृत्ती होते. मुंबईकरांना सिव्हिक सेन्स असायला हवा. मुंबईची काळजी घेणं सर्वांचीच जबाबदारी असल्याचं महापौर म्हणाले. 

त्यानंतर महापौरांनी दिव्यांशचा शोध सुरू असल्याचं सांगितलं. त्या परिसरातील संपूर्ण नाला बंद आहे. मात्र ज्या ठिकाणी दिव्यांश पडला त्याच ठिकाणी नाला उघडा का होता? याबाबतची चौकशी करणार असल्याचं सांगत. पर्जन जलवाहिन्या विभागातील जो कोणी याप्रकरणात दोषी आढळेल त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसे कारवाईचे आदेशचं देण्यात आले आहेत. 

स्थानिकांचा रास्तारोको 

महापौर घटनास्थळावर दाखल होण्याआधी आंबेडकर नगरमध्ये रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. दिव्यांश वाहून जाण्याच्या या घटनेला केवळ मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. 

३ वर्षांचा चिमुकला पडला गटारात

आंबेडकर नगर परिसरातील नाल्याच्या मॅनहोलमध्ये तीन वर्षांचा चिमुरडा पडल्याची दुर्देवी घटना घडली. अद्यापही या चिमुरड्याचा शोध लागलेला नाही. पालिका कर्मचारी, पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान बुधवारी रात्रीपासून या मुलाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. रात्री १०. २४ वाजता ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज एएनआयनं ट्विटरवर पोस्ट केले आहे. व्हिडिओमध्ये एक चिमुरडा रस्त्यावरून चालत चालत त्या गटाराजवळ आला आणि त्या गटारात पडला. या चिमुकल्याचा रात्रीपासून शोध सुरू आहे. चिमुकला सापडत नसल्यानं या मुलाचे आई-वडील रडत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महापौर म्हणतात...उघड्या गटारांसाठी मुंबईकर जबाबदार Description: गोरेगावमध्ये एक चिमुरडा उघड्या गटारात पडून वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेनंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी मुंबईकरांनाच जबाबदार ठरवलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles