MBA CET : एमबीए सीईटी 27 एप्रिलला होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2023 | 21:41 IST

MBA CET will be held on 27th April 2023 : महाराष्ट्र राज्य सीईटी सेल गुरुवार 27 एप्रिल 2023 रोजी एका दिवसांत राज्यभरात ऑनलाईन सीईटी घेणार आहे. ज्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही अशांना परीक्षा देता येणार आहे. 

MBA CET
एमबीए सीईटी 27 एप्रिलला होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • MBA CET : एमबीए सीईटी 27 एप्रिलला होणार
  • आधी 25 आणि 26 मार्च रोजी झाली होती एमबीए सीईटी
  • तांत्रिक कारणामुळे काही जणांना परीक्षा देता आली नव्हती त्यांना 27 एप्रिला परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळेल

MBA CET will be held on 27th April 2023 : महाराष्ट्र राज्य सीईटी सेलमार्फत एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 25 आणि 26 मार्च रोजी राज्यभरात ऑनलाईन सीईटी घेण्यात आली. महाराष्ट्रातील 191 केंद्रांवर ही सीईटी झाली. पण पहिल्या दिवशी तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही. सर्व्हर डाऊन झाले आणि विद्यार्थ्यांना सीईटी देणे अशक्य झाले. याच कारणामुळे पुन्हा एकदा सीईटी घेण्याची मागणी होत होती. ही मागणी अखेर महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने मान्य केली आहे.

ताज्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सीईटी सेल गुरुवार 27 एप्रिल 2023 रोजी एका दिवसांत राज्यभरात ऑनलाईन सीईटी घेणार आहे. ज्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही अशांना परीक्षा देता येणार आहे. 

महाराष्ट्रात एमबीएसाठी ऑनलाईन सीईटी गुरुवार 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत होणार आहे. याबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एमबीए सीईटीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

अंबानींच्या पार्टीतले हे रुचकर पदार्थ बघून तोंडाला सुटेल पाणी

AI ने तयार केले दिग्गजांचे सेल्फी घेतानाचे फोटो


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी