कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रेल्वे प्रशासनासोबत विविध मागण्यासाठी बैठक 

कल्याण कसारा कर्जत (के३) रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे कल्याण ते कसारा व कल्याण ते कर्जत या मार्गावर प्रवाशांना  भेडसाविणा-या समस्या रेल्वे प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासन यांच्यात दीर्घ बैठक झाल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली. 

Meeting of office bearers of Kalyan Kasara Karjat Railway Passengers Association with Railway Administration for various demands
कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा पुढाकार 

मुंबई :  कल्याण कसारा कर्जत (के३) रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे कल्याण ते कसारा व कल्याण ते कर्जत या मार्गावर प्रवाशांना  भेडसाविणा-या समस्या रेल्वे प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासन यांच्यात दीर्घ बैठक झाल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली. 

संघटनेतर्फे वेळवेळी  मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक ,मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक व विविध विभागातील संबधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पञव्यवहार आणि दुरध्वनीवरून संघटनेतर्फे पाठपुरावा करण्यात आला. तसेच नुकतेच टिटवाळा रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३३ ची नियमित लोकल एसी लोकल केल्यानंतर स्थानिक प्रवाशांचा आक्रोशाबाबतही डीएमआर शलभ गोयल यांना माहिती देण्यात आली. 

या संदर्भात एक बैठक बुधवारी सायंकाळी ५ वा झाली. या बैठकीला के३ रेल्वे प्रवासी  संघटनेतर्फे अध्यक्ष- राजेश घनघाव ,सरचिटणीस- श्याम उबाळे ,विभागिय उपाध्यक्ष विजय देशेकर , प्रमुख सल्लागार चंद्रकांत जाधव आणि वासिंद रेल्वे स्थानक प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित होते. तर रेल्वे प्रशासनातर्फे डीआरएम शलभ गोयल ,सिनियर डीसीएम  श्री वंजारी  सिनियर डीओएम , आरपीएफ आयुक्त  श्रीवास्तव आणि डीआरएम यांचे स्वीय सहाय्यक उपस्थितीत होते .

प्रवासी संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे 

१) टिटवाळा स्थानकातून  सकाळी ८.३३ वा.सुटणारी लोकल ऐवजी त्यावेळेत एसी लोकल सुरू केल्याने मध्यमवर्गीय दैनंदीन चाकरमान्यांची होणारी ससेहोलपट व टिटवाळा स्थानकात उसळणारी गर्दी व प्रवाशांमधील आक्रोश व यामुळे आंबिवली व शहाड स्थानकातील प्रवाशांना बसणारा गर्दीचा फटका  हे सर्व वास्तवदर्शी चिञ रेल्वे अधिका-यांसमोर मांडण्यात आले याशिवाय संघटनेतर्फे या निषेधार्थ सह्यांची मोहिम राबविली असता त्यात मिळालेला प्रतिसाद याची पोटतिडकीने मांडणी करण्यात आली .रेल्वे वरिष्ठ आधिका-यांनी एसी लोकल चालविण्याबाबतची अपरिहार्यता व यापुढे सर्व लोकल या एसी लोकल चालविण्याचा रेल्वे बोर्ड दिल्ली यांचा आदेश याबाबत विस्तृतपणे एसी लोकलचे समर्थन करण्यात आले .यावर संघटनेने ८.१९ व ८.५३ या दरम्यान टिटवाळा येथे नविन लोकल फेरी वाढविण्याची सुचना केली त्याला तत्वतः त्यांनी  मान्य करून सिनियर डिओएम  वंजारी  यांनी पुन्हा एकदा वेळापञकात फेरबदल करू असे आश्वासित केले .रेल्वे प्रशासनातर्फे केडीएमसी व राज्य परिवहन विभागाला पञ लिहून टिटवाळा स्थानकातून  पिक अवर्सला कल्याण -ठाणे येथे जादा बसेस सोडण्यात यावे असा पञव्यवहार करावा व लोकलमधील गर्दीचा ताण कमी करावा  ही सुचना संघटनेतर्फे करण्यात आली त्यावर डिआरएम यांनी या सुचनेचे स्वागत करून संबधित अधिका-याला अंमलबजावणीची सुचना केली     

 २) खर्डी येथील इगतपुरी एंडचा एफओबी विस्तार पश्चिमेला ज्या ठिकाणी वसाहत आहे तेथे तातडीने करावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली व स्थानिक अधिकारी सीसीआय व सिनीयर सेक्शनल इंजिनियर हे सहकार्य करत नसल्याची तक्रार केली .त्यावर रेल्वे अधिका-यांनी याची दखल घेतल्याचे सांगून हा एफओबी तात्काळ मंजुर करण्यात येईल असे आश्वासित केले .
 
 ३) आटगाव येथील तिकिट खिडकी नविन एफओबीवर हलवावी या सुचनेला मान्यता देऊन येत्या दोन महिन्यात तिकिटघर होईल असे आश्वासन दिले
 
४) आसनगाव स्थानकात  कसारा एंडला पुर्व व पश्चिमेला जोडणारा एफओबीचे काम सुरू करावे ही मागणी संघटनेतर्फे करण्यात आली त्यावर रेल्वे अधिका-यांनी पुर्वेकडे भुसंपादन प्रक्रियेची सुरूवात केल्याचे सांगितले 

 ५) वासिंद येथील आरओबीचे गर्डर टाकण्याकरिता ताबडतोब  ब्लौक घ्यावा यावर त्यांनी सकारात्मकता दाखवून रेल्वे  सेफ्टी कमिशनच्या  (सीआरएस )  परवानगीकरिता पञ पाठविण्याचे कबुल केले .गर्डरचे स्ट्रक्चर येत्या १५ दिवसात पुर्ण करणार असल्याची माहिती दिली  . पीडब्ल्युडीचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली त्यावर संघटनेतर्फे पीडब्ल्युडी विभागाशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले .
 
 ६) खडावली रेल्वे स्थानकात नविन एफओबी मंजुर करावा व पाणपोई ,स्वच्छता व फलाट दुरूस्ती करण्यात यावी ही सुचना करण्यात आली त्यावर रेल्वे अधिका-यांनी हे स्थानक तिसरी चौथी मार्गिका विस्तारात सद्य जागेवरून स्थलांतिर करून त्याचा पुनर्विकास करणार असल्याचे सांगितले 
 
 ७) टिटवाळा रेल्वे स्थानकातील आरओबी ताताडीने पुर्ण करण्याची मागणी केली त्यावर रेल्वे अधिका-यांनी गर्डच स्ट्रक्चर पुर्ण झाले असून सीआरएस परवानगीकरिता पाठविल्याचे सांगितले 
 
 ८) आंबिवली रेल्वे स्थानकाची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावी  या मागणीवर त्यांनी येत्या २ महिन्यात हे काम पुर्ण केले जाईल व प्रस्तावित लिफ्ट एस्केलेटर पुर्ण करण्याचे आश्वासन दिले 
 
 ९) खर्डी आटगाव वासिंद टिटवाळा शहाड कल्याण येथील फलाट उंचीचे काम ताबडतोब हाती घ्यावे ही सुचना केली असता त्यांनी  तातडीने  सर्व्हे करून हे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले 
 
 १०) कल्याण फलाट १ ए वर एस्केलेटर बसवून अरूंद एफओबीवरील गर्दी कमी करावी अशी मागणी केली त्यावर या फलाटावर जागा अरूंद असल्याने लिफ्टचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले .संघटनेतर्फे या होमफलाटाच्या ञृटी दाखविण्यात आल्या त्या रेल्वे अधिका-यांनी मान्य केल्या .
 
 ११) बदलापुर होमफलाट करिता नगरपरिषदेसोबत जागा हस्तांतरणाबाबत बैठक लावण्याची मागणी करण्यात आलेय 
 
 १२) वांगणी रेल्वे स्थानकात नविन एफओबीची मागणी करण्यात आली त्यावर डिआरएम गोयल यांना ताबडतोब प्रस्ताव मंजुर करण्याचे आश्वासन दिले  
 
 १३) संघटनेतर्फे कल्याण कसारा तिसरी चौथी मार्गिका ,कल्याण बदलापुर तिसरी मार्गिका व कल्याण यार्ड रिमौडेलिंग प्रकल्प तातडीने पुर्ण व्हावे याकरिता राज्य सरकार व रेल्वे मंञालय याकडे पाठपुरावा करावा अशी विनंती डिआरएम यांना करण्यात आली व भुसंपादन प्रक्रियेत स्थानिक प्रशासन / प्रांत कार्यालय येथे संयुक्त रित्या पाठपुरावा करण्याची संकल्पना संघटनेतर्फे मांडण्यात आली यावर डिआरएम गोयल यांनी संबधित अधिका-यांना सुचना केल्या .
 
 १४)कल्याण कसारा व कल्याण कर्जत पिकअवर्सला लोकल चालवावी या मागणीवर सकारात्मक विचार करू असे डिआरएम गोयल व सिनियर डिओएम वंजारी यांनी अनुकुलता दर्शविली . 
 
 १५) लोकलमधील पिकअवर्समधील गर्दी कमी व्हावी व कसारा नाशिक येथून दैनंदीन प्रवास करणा-या चाकरमान्यांना दिलासा मिळावा याकरिता मुंबई दिशेने चालणाऱ्या राज्यराणी ,पंचवटी यासारख्या आंतर जिल्ह्यांमधील एक्सप्रेस मेल यांना कसारा स्थानकात २ मि.चा थांबा देण्याची मागणी केली त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे सिनियर डिओएम वंजारी यांनी अनुकुलता दर्शविली आहे  
 
 १६) उंबरमाळी तानशेत या स्थानकात तिकिटघर इंडीकेटर व अनाऊंसमेंट सुरू करावे ही सुचना करताच ते प्रस्तावित असल्याची माहिती सिनियर डिसीएम यांनी दिली 
 
 १७) आरपीएफ आयुक्त श्रीवास्तव यांना कल्याण कसारा व कल्याण कर्जत मार्गावरील वाढती गुन्हेगारी व  अनधिकृत  अतिक्रमण व महिला प्रवाशांची सुरक्षितता व प्रवासा दरम्यानचे रेल्वे अपघात  या विषयावर  स्थानिक अधिकारी व के३ संघटना अशी संयुक्त  बैठक घेण्याची सुचना मांडली व प्रत्येक स्थानकात आरपीएफ पोलिस पेट्रौलिंग करिता तैनात असावेत ही मागणी केली त्यावर त्यांनी तातडीने कार्यवाही करू असे सांगितले व स्वतः या मार्गावर परिक्षणाकरिता येऊ असे सांगितले ..ही बैठक  १.४५ मिनिट चालली .

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी