Mumbai Local Mega Block : मुंबई : उद्या रविवार २८ ऑगस्ट २०२२ रोजी रेल्वेने मेगाब्लॉक जारी केला आहे. जर रविवारच्या दिवशी तुम्ही लोकलने प्रवास करणार असाल तर रेल्वेचे हे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा. (mega block 28th august 2022 harbour and trans harbour line for maintenance work)
Crime News : नायगाव रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, खुनाचे कारण अस्पष्ट
मेगा ब्लॉक — DRM Mumbai CR (@drmmumbaicr) August 27, 2022
दिनांक २८.०८.२०२२ (रविवार).@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/DKVsI2ipCj
उद्या रविवारी हार्बर मार्गावरील चुनाभट्टी/माहीम ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी ११ वाजल्यापासून सांयकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/माहीम पर्यंत सकाळी ११ वाजून ४० मिनिटापासून ते सांयकाळी ४ वाजून ४० मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटापासून ते सांयकाळी ४ वाजून १०मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
मेगा ब्लॉक — DRM Mumbai CR (@drmmumbaicr) August 27, 2022
दिनांक २८.०८.२०२२ (रविवार)I@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/4bDqymHaaK
उद्या रविवारी मध्य आणि पश्चिम मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक नसणार आहे. तांत्रिक कामासाठी उद्या फक्त हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर जरी मेगाब्लॉक असला तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या बस उपलब्ध असतात. प्रवाशी बसचा पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जाऊ शकता.
𝐌𝐄𝐆𝐀 𝐁𝐋𝐎𝐂𝐊 — DRM Mumbai CR (@drmmumbaicr) August 27, 2022
𝐎𝐍 𝐃𝐀𝐓𝐄 𝟐𝟖/𝟎𝟖/𝟐𝟎𝟐𝟐 (𝐒𝐔𝐍𝐃𝐀𝐘).@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/80ck0ctFf6
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.