Mega block : मुंबईकरांनो घराबाहेर पडताय मग रेल्वेचं वेळापत्रक पाहिलं का? आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 26, 2021 | 11:42 IST

Mega block  on  Central And Harbor  Route : आज रविवारच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करायचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. घराबाहेर पडताना मेगा ब्लॉकची माहिती जरूर जाणून घ्या. आज मध्य (Central) आणि हार्बर (Harbor ) मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक (Mega block) असेल. देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येईल,

Mega block on Central and Harbor Way today
आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद
  • हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गोरेगावकडे सुटणाऱ्या गाड्या बंद राहणार

Mega block  on  Central And Harbor  Route : मुंबई : आज रविवारच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करायचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. घराबाहेर पडताना मेगा ब्लॉकची माहिती जरूर जाणून घ्या. आज मध्य (Central) आणि हार्बर (Harbor ) मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक (Mega block) असेल. देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून (Central Railway) देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.  

या रेल्वे भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील आणि विद्याविहारमध्ये पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरमधून सकाळी 10.40 पासून दुपारी 3.52 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकावर थांबतील. मेगा ब्लॉक दरम्यान मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार याठिकाणी थांबणार नाहीत.

तर हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा मधून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी इथल्या सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी