megablock on sunday : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या (2एप्रिल, रविवार) मुंबईतील तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे अनेक फेऱ्या रद्दर करण्यात आल्या आहेत. तसेच काही विलंबनाने धावणार आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड वायर्सच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे लोकल गाड्या उशिराने धावत असून त्यांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत.
अधिक वाचा : आजपासून स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर
हर्बर मार्ग
पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या कामामुळे पनवेल ते वाशी मार्गावरील लोकल सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत बंद राहतील. ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूरदरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ट्रान्सहार्बरवरील ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या फेऱ्याही रद्द राहणार आहेत. दरम्यान, ठाणे ते वाशी, सीएसएमटी ते वाशी आणि नेरुळ/बेलापूर-खारकोपरदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लाॅक असणाणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
अधिक वाचा : शामीने कॉन्वेला बाद करत IPL मध्ये केले खास शतक
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान, सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लाॅक असणार आहे. त्यामुळे ब्लॉकवेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.