Mumbai Local Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, फास्ट गाड्यांचे डायव्हर्जन

Mumbai Local Mega Block :लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईतील प्रवाशांना शनिवारी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

'Mega Block' on Central and Harbor Railway Lines on Sunday
Mumbai Local Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, फास्ट गाड्यांचे डायव्हर्जन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर रेल्वे देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी मेगा ब्लाॅक
  • जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर
  • हर्बर मार्गावरील अप आणि डाऊन सेवा ब्लॉक कालावधीमध्ये बंद

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ठाण्याहून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ('Mega Block' on Central and Harbor Railway Lines on Sunday)

अधिक वाचा :Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत CSMT/वडाळा रोडवरून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.48 ते 4.43 वाजेपर्यंत CSMT सोडणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणार्‍या सर्व हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

अधिक वाचा :Hanuman Chalisa : 'हनुमान चालीसा' लाभली, टी सीरिजच्या You Tube चॅनलवर रेकॉर्ड, अब्जावधी लोकांनी बघितला Video

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान सुमारे 20 मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करत येईल.

अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचं पाडकाम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या पुलाचं पाडकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं आज शनिवारी, 8 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. तर बोरिवलीहून चर्चगेटसाठी स्लो लोकल रात्री 11.34 वाजता सुटणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी