Sunday Mega Block local : रविवारी घराबाहेर पडताय? लोकलसंदर्भात ही बातमी वाचाच

Sunday Mega Block local : उद्या रविवार 30 ऑक्टोबर रोजी रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्या उशीराने धावणार आहेत. तसेच अनेक गाड्या रद्द होणार आहेत. उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

mumbai mega block
मेगा ब्लॉक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्या रविवार 30 ऑक्टोबर रोजी रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • यामुळे अनेक गाड्या उशीराने धावणार आहेत. तसेच अनेक गाड्या रद्द होणार आहेत.
  • उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sunday Mega Block local : मुंबई : उद्या रविवार 30 ऑक्टोबर रोजी रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्या उशीराने धावणार आहेत. तसेच अनेक गाड्या रद्द होणार आहेत. उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (mega block on central railway and harbor railway sunday 30th october 2022)

उद्या मध्य रेल्वेवर सकाळी 11.05 पासून ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा ते मुलुंड या अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.25 ते दुपारी 3.55 पर्यंत सर्व फास्ट गाद्या माटुंगा ते मुलुंड मार्गावारील धीम्या मार्गावरील धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या अप मार्गावर सकाळी 10.50 ते 3.46 पर्यंत फास्ट गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान स्लो मार्गावर धावतील. 

अधिक वाचा : कैलास पाटलांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने उस्मानाबादमध्ये शेतकरी आक्रमक, बसची केली तोडफोड, पहा व्हिडीओ

हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सांयकाळी 4.10 पर्यंत कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, वाशी आणि बेलापूर या मार्गावरील संपूर्ण लोकल वाहतूक बंद असणार आहे. तसेच सकाळी 1.16 ते दुपारी 3.47 पर्यंत छत्रपती पनवेल, वाशी आणि बेलापूर ते  शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरील संपूर्ण लोकल वाहतूक बंद असणार आहे
सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान प्रवासी ठाणे, वाशी आणि नेरुळ स्थानकावरून प्रवास करू शकतात अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 

अधिक वाचा : kailas patil : नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी तलावात उतरले, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले

पश्चिम मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक नसणार आहे. गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकादरम्यान रात्री जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी रात्री 12.25 ते पहाटे 4.25 मिनिटापर्यंत सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान वाहतूक प्रभावित होणार आहे. 

अधिक वाचा : Diwali pollution : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दिवाळी दणक्यात, वायू आणि ध्वनी प्रदूषणाने ओलांडल्या मर्यादा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी