Local Mega Block : उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी पहा लोकलचे वेळापत्रक

Mumbai Local Mega Block: उद्या 13 नोव्हेंबर रविवार रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यार येणार आहे. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात येतात. तसेच हार्बर मार्गावरील सेवा बंद असते. जाणून घेऊया उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची वेळ.

mega block
मुंबई मेगा ब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्या 13 नोव्हेंबर रविवार रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यार येणार आहे.
  • मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात येतात.
  • तसेच हार्बर मार्गावरील सेवा बंद असते. जाणून घेऊया उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची वेळ.

Mumbai Local Mega Block: मुंबई : उद्या 13 नोव्हेंबर रविवार रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यार येणार आहे. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात येतात. तसेच हार्बर मार्गावरील सेवा बंद असते. जाणून घेऊया उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची वेळ. (mega block on central railway and harbour railway sunday 13th november 2022)

अधिक वाचा : Thane : शिंदे गटाला गळती, माजी नगरसेविकेने शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर बांधलं शिवबंधन


मध्य रेल्वे

उद्या 13 नोव्हेंबर रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11 : 05 पासून ते दुपारी 3 .55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.25 ते 3.35 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून सुटणार्‍या फास्ट गाड्या माटुंगा गे मुलुंड मार्गावरील स्लो मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे फास्ट गाड्या या 15 मिनिटे उशीराने धावतील. ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणार्‍या फास्ट गाड्या सकाळी 10.50 ते दुपारी 3.26 या वेळेत मुलुंड ते माटुंगा दरम्यान स्लो मार्गावर धावतील, त्यामुळे या गाड्या 15 मिनिटे उशीराने धावतील. 


अधिक वाचा : Crime News जन्मदात्या बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट, पोलीस घेतायेत मुलीचा शोध

हार्बर रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगाव ते पनवेल आणि बेलापूर या अप मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3. 49 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर पनवेल, बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. या वेळेत लोकल सेवा बंद असणा राहे. मेगाब्लॉकच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान काही विशेष गाड्या धावतील.  

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी