Sunday Mega Block : उद्या बाहेर पडण्यापूर्वी मेगाब्लॉकची ही बातमी वाचाच, तिन्ही मार्गावर आहे ब्लॉक

उद्या रविवार २८ मे २०२२ रोजी मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावर आज शनिवारी रात्रीपासूनच मेगा ब्लॉक सुरू होणार आहे. रेल्वे विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

megablock
मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्या रविवार २८ मे २०२२ रोजी मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • पश्चिम मार्गावर आज शनिवारी रात्रीपासूनच मेगा ब्लॉक सुरू होणार आहे.
  • रेल्वे विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

Sunday Mega Block : मुंबई : उद्या रविवार २९ मे २०२२ रोजी मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावर आज शनिवारी रात्रीपासूनच मेगा ब्लॉक सुरू होणार आहे. रेल्वे विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.  


हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्र्यापर्यंत सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच चुनाभट्टी आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वेसेवा पूर्ण बंद असणार आहे. प्रवाशांनी रविवारी मध्य  किंवा पश्चिम रेल्वेने प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते कांदिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आज रात्री ११ वाजता जम्बो मेगाब्लॉक सुरू होणार आहे. हा ब्लॉक १४ तासांचा असून रविवारी दुपारी दीड वाजता संपणार आहे. या ब्लॉक दरम्यान सर्व गाड्या स्लो मार्गावर धावतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी