Mumbai Local Mega Block On sunday : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील मध्य मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळी माटुंगा आणि मुलुंड दरम्यानची जलद मार्गावरील लोकलसेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील. पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. ( Mega block on these railway lines in mumbai; When, where and how?)
अधिक वाचा : Bus Accident in Borghat : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात! जु्न्या मुंबई-पुणे महामार्गावर खोल दरीत कोसळली बस, 8 जणांचा मृत्यू
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लाॅक करण्यात आले आहे. त्यामुळे सीएसएमटीहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्यातून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंग्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
अधिक वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी का आणि कुणाची मागितली माफी?
मध्यरेल्वेसह हार्बर मार्गावरही मेगा ब्लाॅक करण्यात आला होता. पण उद्याच खारघर येथे डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील मेगा ब्लाॅक रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वे मार्गावर कोणत्याही स्वरुपाचा ब्लाॅक असणार नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.