Mega Recruitment Bjp: तिसरी मेगाभरती; आज हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश

मुंबई
Updated Sep 11, 2019 | 08:19 IST

भाजपमध्ये मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य, आनंदराव पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करतील.

bjp and congress
तिसरी मेगाभरती; आज हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश 

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरू आहे.
  • भाजपमध्ये मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
  • काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करतील.
  • हे तिघंही मुंबईतल्या चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये पक्षांतर करतील.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरू आहे. तर भाजपमध्ये मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करतील. हे तिघंही मुंबईतल्या चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये पक्षांतर करतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  आणि माजी मंत्री गणेश नाईक हे वाशीमध्ये ५५ नगरसेवकांसह नवी मुंबईतील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. 

हर्षवर्धन पाटील यांचा आज भाजप प्रवेश 

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आज मात्र यया चर्चांना यानिमित्तानं पूर्णविराम मिळाला आहे. हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्यानं नाराज पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर तोफ डागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. त्याचवेळी पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.  पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठे नेते मानले जातात. 

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश, नवी मुंबई पालिकेवरही फुलणार कमळ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंजी गणेश नाईक आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी ५ वाजता हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपच्या पहिल्या मेगाभरतीत भाजपचा हात धरला. आता गणेश नाईक नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५५ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्या भाजप प्रवेशावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकमेव महापालिकेवर सुद्धा कमळ फुलताना दिसेल. प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी नवी मुंबईत मोठंमोठे बॅनर लावलेत. 

आमदार आनंदराव पाटील भाजपच्या दिशेनं? 

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार आनंदराव पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू मानलं जायचं. सातारा जिल्ह्यात खासदार रणजित निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यानंतर आता आनंदराव पाटील यांनीही काँग्रेसला रामराम केल्यानं जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. 

कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसला रामराम 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान कृपाशंकर यांच्या भाजप प्रवेशावर अजूनही प्रश्न चिन्ह कायम आहे. कृपाशंकर यांचं मुंबई आणि परिसरातील उत्तर भारतीय मतदारांमध्ये वर्चस्व आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेसमध्ये फार सक्रियही दिसले नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mega Recruitment Bjp: तिसरी मेगाभरती; आज हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश Description: भाजपमध्ये मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य, आनंदराव पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करतील.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles