Megablock at this location today on the Mumbai Suburban Railway line : आज रविवार 5 मार्च 2023. आजच्या दिवशी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वे अंतर्गत हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक (Megablock Sunday 05 March 2023) आहे. ट्रान्सहार्बर आणि उरण मार्गावर मेगाब्लॉक नाही. ट्रान्सहार्बरवर ठाणे ते नेरुळ/वाशी गाड्या सुरू असतील पण ठाणे ते पनवेल गाड्या मेगाब्लॉक काळात नसतील.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर सकाळी 11 ते दुपारी 3.55 या वेळेत मेगाब्लॉक आहे. या काळात माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवरील गाड्या अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर वळवण्यात येतील.
हार्बरवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत मेगाब्लॉक आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/ CSMT / सीएसएमटी) ते वाशी या मार्गावर विशेष गाड्या धावतील. मेगाब्लॉक काळात वाशी ते पनवेल दरम्यान गाड्या नसतील.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मेगाब्लॉक आहे. या काळात सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवरील गाड्या अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. काही बोरिवली ट्रेन गोरेगावपर्यंतच धावतील.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?
मजबूत हाडांसाठी खा हे 7 पदार्थ
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.