Megablock In Mumbai : मुंबईत आज मध्यरात्रीपासूनच मेगाब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 25, 2023 | 09:59 IST

Megablock In Mumbai, Nightblock In Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी दिवसा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान पुलाच्या गर्डर उभारणीसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री 01.10 वाजल्यापासून पहाटे 05.15 वाजेपर्यंत आहे.

Megablock In Mumbai, Nightblock In Mumbai
मुंबईत आज मध्यरात्रीपासूनच मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत आज मध्यरात्रीपासूनच मेगाब्लॉक
  • ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार
  • ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या 15 मिनिटे विलंबाने धावणार

Megablock In Mumbai, Nightblock In Mumbai : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी दिवसा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान पुलाच्या गर्डर उभारणीसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री 01.10 वाजल्यापासून पहाटे 05.15 वाजेपर्यंत आहे. ब्लॉकच्या काळात रेल्वे देखभाल दुरुस्तीची कामं करणार आहे.  या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

Hydrogen Buses in India: भारतात चालणार हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी

Mumbai : Central Railway Timetable : मध्य रेल्वे मार्गावरील या उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळांमध्ये बदल, बघा टाईमटेबल

मेगाब्लॉक

अ. मध्य रेल्वे : मुख्य मार्ग (मेन लाईन) : माटुंगा ते मुलुंड 

मार्ग : अप आणि डाऊन धीमा (स्लो)

वेळ : सकाळी 11 ते दुपारी 3.55 पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात धीम्या (स्लो) लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद (फास्ट) मार्गावर वळवण्यात येतील. या फेऱ्या जलद (फास्ट) मार्गावरील थांब्यावर नियोजित थांब्यावर थांबतील. काही फेऱ्या रद्द राहणार असल्याने काही फेऱ्यांची वाहतूक विलंबाने होणार आहे.

ब. हार्बर रेल्वे : पनवेल ते वाशी

मार्ग : अप-डाऊन जलद/धीमा आणि पाचवी-सहावी मार्गिका

वेळ : 

वेळ : सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी मुंबई) ते पनवेल/बेलापूरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे ते पनवेल अप-डाऊन फेऱ्यादेखील रद्द होणार आहेत. मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. बेलापूर ते खारकोपर आणि नेरळ ते खारकोपरदरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

क. पश्चिम रेल्वे : सांताक्रुझ ते गोरेगाव

मार्ग : अप आणि डाऊन जलद (फास्ट)

वेळ : सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात जलद (फास्ट) मार्गावरील फेऱ्या धीम्या (स्लो) मार्गावर वळविण्यात येणार आहेत. काही बोरिवली लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्यांची वाहतूक विलंबाने होणार आहे.

ड. अ. मध्य रेल्वे : मुख्य मार्ग (मेन लाईन) : नाहूर ते मुलुंड

वेळ : रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री 01.10 वाजल्यापासून पहाटे 05.15 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात लोकल फेऱ्या धावणार नाहीत

ब्लॉकआधीची शेवटची लोकल

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.24 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी मुंबई) ते कर्जत

शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.52 वाजता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी मुंबई)

ब्लॉकनंतर पहिली लोकल

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 04.47 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी मुंबई) ते कर्जत

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 04.48 वाजता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी मुंबई)

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर ब्लॉकचा परिणाम

11020 कोणार्क एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत चालवणार

12810 हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकापर्यंत चालवणार

एक तास विलंबाने धावणाऱ्या गाड्या

18030 शालिमार एक्स्प्रेस
18519 विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस
12134 मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
20104 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस
12702 हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

रद्द करण्यात आलेल्या लोकल

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.20 : सीएसएमटी-कुर्ला

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.28 : सीएसएमटी-ठाणे

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.31 : सीएसएमटी-कुर्ला

रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.29 : दादर-ठाणे

शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.11 : कल्याण-दादर

शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी अंशत: रद्द केलेल्या लोकल 

रात्री 10.10 : आसनगाव-सीएसएमटी (ठाणे ते सीएसएमटी रद्द)

रात्री 10.15 : अंबरनाथ-सीएसएमटी (कुर्ला ते सीएसएमटी रद्द)

रात्री 10.56 : कल्याण-सीएसएमटी (कुर्ला ते सीएसएमटी रद्द)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी