पुढील पाच दिवसात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस...; पाहा जिल्हानिहाय हवामान अंदाज

Weather Alert: राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

Meteorological department orange alert in the state; Chance of unseasonal rain
पुढील पाच दिवसात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस...; पाहा जिल्हानिहाय हवामान अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
  • पाच दिवस विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारपीटीचा पाऊस पडण्याची शक्यता
  • विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही होण्याचा अंदाज

मुंबई : राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. कोल्हापूर, सातारा, नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Meteorological department orange alert in the state; Chance of unseasonal rain)

अधिक वाचा : Ajit Pawar : सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा रुद्रावतार, अजितदादा सरकारवर चांगलेच बरसले

 हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तसेच 16 मार्च रोजी गारपिटीचा इशारा जारी केला असून, 16 आणि 17 मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होऊ शकते. अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अधिक वाचा : गुरुग्राममध्ये पैशांचा पाऊस! धावत्या कारमधून शाहिद कपूर स्टाईलमध्ये उधळले लाखो रुपये, पहा नेमकं काय घडलं?

पुढील दोन दिवस कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि धुळीच्या वादळाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे, काढणी केलेली पिके आणि भाजीपाला, फळे आणि फुले आणि रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी