मुंबई : मेट्रोची कारशेड आरेमध्येच होणार!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 01, 2022 | 09:24 IST

metro car shed will be built in Aarey : मुंबईत मेट्रो तीनची कारशेड आरे कॉलनीतच होणार आहे. या कारशेडसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

metro car shed will be built in Aarey
मुंबई : मेट्रोची कारशेड आरेमध्येच होणार!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई : मेट्रोची कारशेड आरेमध्येच होणार!
  • मुंबईत मेट्रो तीनची कारशेड आरे कॉलनीतच होणार
  • आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

metro car shed will be built in Aarey : मुंबईत मेट्रो तीनची कारशेड आरे कॉलनीतच होणार आहे. या कारशेडसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

सध्या आरे कारशेड हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. ठाकरे सरकारने आरे कॉलनीला वन क्षेत्र जाहीर केले आहे. याआधी आरे हे वन क्षेत्र नव्हते. गायीगुरांना चरण्यासाठीचे गवत आणि मर्यादीत झाडे असे आरे कॉलनीचे स्वरुप असल्यामुळे या भागाला वनक्षेत्राचा दर्जा नव्हता. नव्याने स्थापन झालेले शिंदे सरकार आता ठाकरे सरकारचे मेट्रो कारशेड संदर्भातले निवडक निर्णय बदलण्याची तयारी करत आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार हे निश्चित झाले होते. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आरेतील कारशेडला विरोध होता. पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून आणि या मुद्याला राजकीय वळण देऊन उद्धव ठाकरे यांनी पुढे ठाकरे सरकारच्या काळात आरेतील कारशेडचे काम थांबवले होते. आता या प्रश्नात निर्माण झालेली गुंतागुंत सोडवून आरेतील कारशेडचे काम लवकर सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. 

आरे कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्यावतीने नवे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणे आणि सरकारी पातळीवर कारशेडला पूरक असे निर्णय घेणे यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीस यांनी निर्देश देताच घडामोडींना वेग आला आहे.

आरे कॉलनीत ८०४ एकर परिसर आहे. यापैकी मर्यादीत भूभाग मेट्रो कारशेडसाठी वापरला जाणार आहे. उर्वरित आरे कॉलनी सुरक्षित राहणार आहे. शिवाय आरे कॉलनीत कारशेड केल्यामुळे मेट्रोची वाहतूक हाताळणे, मेट्रोची देखभाल करणे ही कामं सोपी होणार आहेत. कारशेडचे काम ठाकरे सरकारच्या काळात दीर्घकाळ स्थगित झाल्यामुळे राज्याला मोठा आर्थिक फटका बसला. नागरिकांना जी मोठी पायाभूत सुविधा एव्हाना मिळाली असती ती आजही प्रलंबित आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेमध्येच मेट्रो तीनची कारशेड झाली पाहिजे, अशा सूचना महाधिवक्त्यांना दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी