मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री (Minister of Higher and Technical Education) उदय सामंत (Minister Uday Samant) आहे ट्विट करून दिली होती. आता परीक्षेविषयी नवीन माहिती उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
पुढच्या वर्षापासून सीईटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबरपासून सत्र सुरू होईल, अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण कमी वाटत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात, येईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.
या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET च्या मार्कांवर प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता बारावीचे 50 टक्के आणि CET चे 50 टक्के अशा एकूण मार्कांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं नक्कीच वाढणार आहे असं उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटीद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू असणार आहे.
MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.