MH SET Admit Card Released 2023: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य पात्रता प्रवेशपत्र म्हणजेच MH SET ADMIT CARD 2023 जारी करण्यात आले आहे. MH SETची परीक्षा 26 मार्चला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. सकाळी 10 ते 11 आणि 11:30 ते दुपारी 1:30 या दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. पेपर 1 मध्ये 50 प्रश्न असतील आणि पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असतील. सर्व प्रश्न अनिवार्य असतील. जे उमेदवार ही परीक्षा देत आहेत त्यांना आता प्रवेश कार्ड काढता येणार आहे. (Maharashtra "SET 2023" Exam Admit Card Released, Download)
अधिक वाचा : Daily Horoscope: चार राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमचं भविष्य
यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे लागेल. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरून तुम्हाला हॉल तिकीट पाहता येतील. जे उमेदवार या SET EXAM 2023 या परीक्षेला बसणार आहेत ते आता Savitribai Phule Pune University (SPPU) च्या अधिकृत वेबसाइटवरुन SET Exam Admit Card 2023 वरून डाऊनलोड करू शकतात.
अधिक वाचा : घनदाट अन् लांब केस हवे तर करा 'हे' काम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर 38वी MH SET परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत ते त्यांचं आयडी, नाव किंवा अर्ज क्रमांक टाकून MH SET हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी MH SET परीक्षा 26 मार्च 2023 रोजी घेतली जाईल.
अधिक वाचा :Ind Vs Aus: 10 विकेट्स राखत ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार विजय
परीक्षेच्या दिवशी उमेदवाराने सेट प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल. उमेदवारांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रवेशपत्रासोबत त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादीसारखे अतिरिक्त फोटो ओळखपत्र पुरावे सोबत ठेवावे. उमेदवारांच्या सोयीसाठी खाली सोप्या स्टेप्स खाली दिल्या आहेत.
(a) SET परीक्षा ऑफलाइन ऑब्जेक्टिव्ह (Objective) मोडमध्ये घेण्यात येईल. परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपरमध्ये केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि ते परीक्षेच्या दिवशी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये ब्रेक न घेता घेतले जातील.
Admit Card Download - डाऊनलोड करा प्रवेशपत्र MH SET 2023 admit card
(b) पेपर-I हा सर्वसाधारण स्वरूपाचा असेल, ज्याचा उद्देश उमेदवाराच्या अध्यापन/संशोधनाच्या योग्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी असेल. हे प्रामुख्याने तर्क क्षमता (reasoning ability), आकलन क्षमता (comprehension), भिन्न विचारसरणी (divergent thinking) आणि उमेदवाराची सामान्य जागरूकता (general awareness) तपासण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पेपर-I मध्ये प्रत्येकी दोन गुणांचे पन्नास (50) वस्तुनिष्ठ प्रकारचे अनिवार्य प्रश्न असतील.
(c) पेपर-II मध्ये उमेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित शंभर (100) वस्तुनिष्ठ प्रकारचे अनिवार्य प्रश्न असतील (गणितशास्त्र वगळता). प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. गणित विज्ञानामध्ये, विद्यार्थ्याला सर्व प्रश्न (100) विभाग I आणि II मधील किंवा फक्त विभाग Iआणि III मधील सोडवावे लागतील.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.