घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? मग भरा म्हाडाचा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या शेवटची तारीख

मुंबई
Updated Jan 05, 2023 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लॉटरीसाठी (Maharashtra Housing and Area Development Authority) रजिस्ट्रेशची सुरुवात 5 जानेवारी 2023 पासून होणार आहे. जे मुंबईकर म्हाडा लॉटरी 2023 मध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांनी लगेच आपल्या हातातील काम सोडून म्हाडाच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि अर्ज करत आपल्या घराच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाका.

MHADA Lottery 2023: Check out the online application instructions and register today
हक्काच्या घरासाठी भरावा लागेल म्हाडाचा अर्ज, पण कसा?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • 5 जानेवारी 2023 पासून ते 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज भरू शकता. 
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय आहे पात्रता
 • आवश्यक कागदपत्रे कोणती?

मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लॉटरीसाठी (Maharashtra Housing and Area Development Authority) रजिस्ट्रेशची सुरुवात 5 जानेवारी 2023 पासून होणार आहे. जे मुंबईकर म्हाडा लॉटरी 2023 मध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांनी लगेच आपल्या हातातील काम सोडून म्हाडाच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि अर्ज करत आपल्या घराच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाका. म्हाडाचे घर मिळवण्यासाठी नागरिकांना आधी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. हा अर्ज कशाप्रकारे करावा लागेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

कुठे-कुठे  मिळणार तुमच्या हक्काचं घर?

म्हाडाने गोरेगाव वेस्ट, सायन, बोरीवली, पवई या भागात संकूल उभारली आहेत. या भागात तुम्हाला तुमचं घर मिळेल.  

 काय आहे अर्ज भरायची शेवटची तारीख?

5 जानेवारी 2023 पासून ते 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज भरू शकता. 

मुंबई म्हाडा लॉटरी 2023 साठी अर्ज कसा करावा?

 1. lottery.mhada.gov.in ला भेट द्या.
 2. रजिस्टरवर क्लिक करा.
 3. तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
 4. तुमची प्राथमिक माहिती भरा.
 5. तुमच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
 6. लॉटरी आणि योजना निवडा.
 7. पावती छापा.
 8. म्हाडा लॉटरी 2023 चा अर्ज पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा.

अधिक वाचाः काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये

म्हाडा लॉटरी 2023: अर्जदाराची पात्रता - 

 1. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणं आवश्यक आहे.
 2. महाराष्ट्राचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 3. लो इनकम गटातील फ्लॅटसाठी अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु. 25 हजार ते 50 हजार इतकं असणं आवश्यक आहे.
 4. मिडल इनकम गटातील फ्लॅटसाठी अर्जदाराचे मासिक उत्पन्न 50 हजार ते 75 हजार इतकं असणं आवश्यक आहे.
 5. हाय इनकम गटातील फ्लॅटसाठी अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु 75 हजार किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे.

अधिक वाचाः भारतीय रेल्वेत परीक्षा न देता थेट नोकरी,10वी पास करा Apply

म्हाडा लॉटरी 2023 च्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेः

 1. अर्जदाराचे आधार कार्ड
 2. अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र
 3. महाराष्ट्राचे अधिवास (Domicile)प्रमाणपत्र
 4. ड्रायव्हिंग लायसन्स
 5. पॅन कार्ड
 6. बँक खात्याचे तपशील
 7. अर्जदाराचा पासपोर्ट 
 8. शाळा सोडल्याचा दाखला
 9. मतदार ओळखपत्र

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी