MHADA Lottery 2023 : मुंबईतील घराचे स्वप्न सत्यात उतरणार, म्हाडाच्या 2,683 घरासाठी लाॅटरी

Mhada Lottery 2023 in marathi : म्हाडाच्या लॉटरीसाठी मुंबईकरांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. आता मार्च महिन्यात ही लॉटरी लागणार असून, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी गोरेगावमधील 2,683 घरांचाही लॉटरीत समावेश होणार आहे.

MHADA Lottery 2023: Dream of a house in Mumbai will come true, lottery for 2,683 houses of MHADA
MHADA Lottery 2023 : मुंबईतील घराचे स्वप्न सत्यात उतरणार, म्हाडाच्या 2,683 घरासाठी लाॅटरी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • म्हाडाची बहुप्रतिक्षित लॉटरी मार्चमध्ये आहे
  • लॉटरीची तयारी अंतिम टप्प्यात आहे
  • गोरेगावमधील 2,683 घरांचीही लॉटरीत

Mhada Lottery 2023 in marathi : मुंबईकरांना म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मार्चमध्ये लॉटरी काढण्याची तयारी सुरू झाली आहे. सोडतीच्या तयारीला अंतिम टच देण्यात येत आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. मुंबई मंडळाच्या या सोडतीत सुमारे 4 हजार घरांचा समावेश असणार आहे. त्यापैकी सर्वाधिक 2,683 घरे ही गोरेगावच्या टेकडी प्रकल्पातील असतील. याशिवाय कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश करण्यात येणार आहे. (MHADA Lottery 2023: Dream of a house in Mumbai will come true, lottery for 2,683 houses of MHADA)

अधिक वाचा : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य!

गोरेगावमध्ये दोन प्रकल्प

गोरेगावमध्ये म्हाडा भूखंड-अ आणि भूखंड-ब वर दोन प्रकल्प उभारत आहे. लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या प्लॉट-ए मधील प्रकल्पात इकॉनॉमी वीकर विभागात (EWS) प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारतींचा समावेश आहे. यामध्ये 322 चौरस फुटांची 1239 घरे आहेत. तर, एसव्ही रोडजवळ असलेल्या प्लॉट-बी वरील 4-4 इमारती EWS आणि LIG (लोअर इन्कम ग्रुप) च्या आहेत. त्यांची अनुक्रमे 708 आणि 736 घरे लॉटरीत लागणार आहेत.

अधिक वाचा : Mumbai to Shirdi Vande Bharat Express। साई भक्तांसाठी आनंदाची बातमी ; एका दिवसात करता येणार मुंबई टू शिर्डी रिटर्न प्रवास, Check ticket Price

45 लाखांपर्यंत किंमत असेल!

गोरेगावमध्ये EWS घरांच्या किमती 35 लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. तर, एलआयजी घरांच्या किमती 45 लाखांपर्यंत जाऊ शकतात. एमआयजी आणि एचआयजीची घरे आता तयार होत आहेत. त्याची किंमत नंतर ठरवली जाईल. यावेळीही या सदनिकांचा लॉटरीत समावेश होणार नाही. म्हाडाच्या घरांच्या लॉटरीनंतर आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही लॉटरीत फक्त ओसी मिळालेल्या घरांचा समावेश करू. लॉटरी जिंकल्यानंतर, लोकांना पैसे भरताच त्यांच्या घराच्या चाव्या दिल्या जातील. 

अधिक वाचा : Aditya Thackeray यांच्या गाडीवर हल्ला ; औरंगाबादमध्ये नेमकं काय झालं?

रजिस्ट्रेशन सुरू

म्हाडाच्या नव्या प्रणालीनुसार लॉटरीसाठी इच्छुक असलेल्यांना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर ते कोणत्याही मंडळाच्या सोडतीत सहभागी होऊ शकतील. नोंदणी करतानाच सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील. म्हाडाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेमुळे लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे तपासण्यात लागणारा वेळ वाचेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी