MHADA houses : सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण 12724 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 5800.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात 2152 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी 2285 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अँटॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी 24 कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी 30 कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी 100 कोटी रुपये, कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजनेसाठी 213.23 कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी 50 कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी 18 कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
हे पण वाचा : कमी झोपणाऱ्यांनो सावधान..., आरोग्याला होऊ शकते मोठे नुकसान
गोरेगांव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा 1 ब साठी 59 कोटी रुपये, गोरेगांव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये, पोलीस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हे पण वाचा : तुमची मुलं सर्व वस्तू फेकतात? मग हे करून पाहाच
कोंकण मंडळाअंतर्गत 5614 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 10 कोटी रुपये, बाळकुम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी 33 कोटी रुपये, माजिवाडे ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी 35 कोटी रुपये, मिरारोड टर्न की प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
हे पण वाचा : ट्रेनमधून टॉवेल, चादर चोरी केल्यास इतकी होईल शिक्षा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.