MHADA Recruitment: म्हाडाची ऑनलाईन परीक्षा होणार नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात होणार

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 21, 2021 | 11:15 IST

MHADA Recruitment : म्हाडामध्ये (MHADA) नोकरी मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या फेब्रुवारी (February) महिन्यात म्हाडाची ऑनलाईन परीक्षा (online Exam) होणार आहे.

MHADA online exam
म्हाडाची ऑनलाईन परीक्षा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • म्हाडा भरती परीक्षा 1 ते 10 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
  • 14 पदांसाठीच्या 565 रिक्त जागांसाठी परीक्षा होणार
  • गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा होणार

MHADA Recruitment Online Exam : मुंबई :  म्हाडामध्ये (MHADA) नोकरी मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या फेब्रुवारी (February) महिन्यात म्हाडाची ऑनलाईन परीक्षा (online Exam) होणार आहे. परीक्षा घेण्यासाठी टीसीएसची (TCS) अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. म्हाडा भरती परीक्षा 1 ते 10 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. म्हाडाच्या नोकरभरतीची परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे.

म्हाडा भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या जी.एस कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे. म्हाडातील 14 पदांसाठीच्या 565 रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. म्हाडातील 14 पदांसाठीच्या 565 रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा रविवार (12 डिसेंबर), बुधवार (15 डिसेंबर), रविवार (19 डिसेंबर) आणि सोमवार (20 डिसेंबर) अशा चार टप्प्यांत घेण्यात येणार होती. मात्र, सचिवांनी पुढील तारीख न सांगता परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती. अखेरच्या क्षणी स्थगितीच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता.

गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याने परीक्षा रद्द

आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली होती, याविषयीची माहिती खुद्द राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. परीक्षा पास करण्यासाठी मध्यस्थांना पैसे देण्यात आल्याची माहिती आव्हाडांनी दिली होती. परीक्षा करत असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली होती.

जी.एस कंपनीशी करार रद्द

राज्य सरकारने विविध भरती परीक्षांसाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड केली होती. या कंपनीला म्हाडा भरतीसाठी नेमण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज भरणे, ते निकाल जाहीर करणे यासाठी प्रति उमेदवार 210 रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार म्हाडा भरतीसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी शुल्क भरले होते. त्यातून कंपनीला सुमारे 6 कोटी रुपये मिळणार होते. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्याने परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला होता. 

म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी कोडवर्डचा वापर

आरोपी म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्ड वापरत होते.घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. त्याचबरोबर घरातील वस्तू कधी मिळणार? याचा अर्थ आहे फुटलेला पेपर कधी मिळणार. हे कोडवर्ड जरी तुम्हाला खरे वाटत नसले तरी हे वाक्य एक कोडवर्ड म्हणून वापरण्यात आले होते. म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणासाठी आरोपी आणि उमेदवारांमध्ये झालेल्या संभाषणामध्ये हा कोडवर्ड वापरण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी