एमआयडीसी सरळसेवा भरती प्रक्रिया, ३४२ जणांना उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग क आणि ड मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

एमआयडीसी सरळसेवा भरती प्रक्रिया, ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान
पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरतीः सुभाष देसाई 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग क आणि ड मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
  • प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली.
  • वेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते.

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग क आणि ड मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते.

 महामंडळातील सरळसेवेची वर्ग आणि ड मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ११ संवर्गातील ५०२ पदांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यातील पाच जणांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालायत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

दरम्यान, या परीक्षेत कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्यालयीन स्तरावरून समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया कॅमेरामध्ये टिपण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, शासनाद्वारे राबविलेली सर्वाधिक पारदर्शक नोकरभरती असल्याचे समाधान देसाई यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी