MIDC Recruitment 2019: MIDCमध्ये नोकरीची संधी, पाहा पद आणि पगार किती

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 27, 2019 | 14:05 IST

MIDC Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. एमआयडीसीच्या अग्निशमन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. जाणून घ्या पदांचे नाव आणि इतर माहिती.

midc recruitment 2019 fire department apply online midcindia.org
फोटो सौजन्य: midcindia.org 

थोडं पण कामाचं

 • तरुणांना नोकरीची संधी
 • एमआयडीसीमध्ये विविध पदांसाठी भरती
 • पात्र उमेदवारांकडन ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज 
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ 

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. एमआयडीसीमधील अग्निशमन विभागातील रिक्त पदांमध्ये चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशीयन आणि मदतनीस (अग्निशमन) या पदांचा समावेश आहे.

पदाचे नाव - चालक यंत्र चालक (वर्ग - क) 

 1. वेतन श्रेणी - एस-७ (रुपये २१,७०० - ६९,१००) 
 2. वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्षे
 3. शैक्षणिक अर्हता: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
  वाहन चालक या पदावर ३ वर्षे काम केल्याचा अनुभव
  जड वाहन चालविण्याचा वैध परवाना 
  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

पदाचे नाव - चालक (अग्निशमन) वर्ग - क 

 1. वेतनश्रेणी - एस - ६ (रुपये - १९,९०० - ६३,२००) 
 2. वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्षे
 3. शैक्षणिक अर्हता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 
  वाहन चालक या पदावर ३ वर्षे काम केल्याचा अनुभव
  जड वाहन चालविण्याचा वैध परवाना 
  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

पदाचे नाव - अग्निशमन विमोचक (वर्ग - क) 

 1. वेतनश्रेणी - एस-६ (रुपये १९,९०० - ६३,२००) 
 2. वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्षे
 3. शैक्षणिक अर्हता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
  राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण आवश्यक
  एमएससीआयटी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण 
  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

पदाचे नाव - वीजतंत्री (ऑटोमोबाईल) ग्रेड-२ 

 1. वेतनश्रेणी - एस-८ (रुपये २५,५०० - ८१,१००)
 2. वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्षे
 3. शैक्षणिक अर्हता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
  शानसमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण असावा

पदाचे नाव - मदतनीस (अग्निशमन) वर्ग - ड

 1. वेतनश्रेणी - एस-१ (रुपये १५,००० - ४७,६००) 
 2. वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्षे
 3. शैक्षणिक अर्हता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
  राज्य अग्निमशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र, शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा 
  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

परीक्षेची तारीख आणि वेळ: 

परीक्षेची तारीख आणि वेळ ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org आणि महापरीक्षा पोर्टलच्या www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. 

या भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण जाहिरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midc.india.org या अधिकृत वेबसाइटवर पहायला मिळेल. तसेच पात्र आणि इच्छुक उमेदवार www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर आपले अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी