गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 07, 2021 | 22:48 IST

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी (७ एप्रिल २०२१) निधन झाले.

mill workers leader datta iswalkar passes away
गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन 

थोडं पण कामाचं

  • गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन
  • दत्ता इस्वलकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार
  • कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी इस्वलकर यांनी लढा उभारला

मुंबईः गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी (७ एप्रिल २०२१) निधन झाले. दत्ता इस्वलकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. संपामुळे गिरणी कामगार संपला असे चित्र निर्माण झाले असताना कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी इस्वलकर यांनी लढा उभारला. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काची घरे मुंबईत मिळवून दिली. इस्वलकर यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे जवळपास दहा हजार कामगारांना मुंबईत घर मिळाले. अनेक गिरणी कामगारांच्या थकीत वेतनासाठी इस्वलकर तीन दशके अविश्रांत लढा देत होते. mill workers leader datta iswalkar passes away

इस्वलकर यांच्या नेतृत्वात संघर्ष समितीने अनेक गिरणी कामगारांना सावरले. लोकशाही मार्गाने आंदोलन करुन इस्वलकर यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड परिश्रम केले. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हे इस्वलकर यांचे मोठे वैशिष्ट्य होते.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या दत्ता इस्वलकर यांनी सत्ताधाऱ्यांशी चर्चा करुन कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कौतुकास्पद अशी कामगिरी केली. अखेरपर्यंत दत्ता इस्वलकर कामगारांसाठी लढत होते. दत्ता इस्वलकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच कामगार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी