मुंबई, 22 जून: सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून स्पष्ट केली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज केलेल्या भाषणाचं MIM चे खासदार इम्तियाज जलील (
Imtiaz Jaleel)यांनी कौतुक केलं आहे.
इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्यतेचं कौतुक करा. शिवसेनेशी आमचे राजकीय/ वैचारिक मतभेद असू शकतात. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशीलतेनं तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली.
Appreciate the truthfulness of @CMOMaharashtra. We may have political/ideological differences with @ShivSena but after hearing Mr Uddhav Thackeray today my respect for him has simply grown. Your politeness gave a tight slap to all the dissenters within your party. @AUThackeray — Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 22, 2022
या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी सीएमओ महाराष्ट्र, शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना टॅगही केलं आहे.
आपल्या भाषणात काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडच्या काळात जे काही काम करायचं ते प्रामाणिकपणे मी काम केलं. त्या दरम्यानच्या काळात जे काही सर्व्हे होत होते त्यानुसार देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश झाला.
गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? बाळासाहेबांची शिवसेना आता कुणाची? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापी शिवसेनेपासून दूर जाऊ शकत नाही. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
२०१४ च्या निवडणुकीत आपण एकट्याच्या ताकदीवर लढलो होतो. त्यावेळी सुद्धा ६३ आमदार शिवसेनेने निवडून आणले. माझ्यासोबत आता मंत्रिमंडळात असलेले नेते, आमदार हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच आहेत. मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं. बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहे. ज्यांना आपण आपले मानतो, मरमर राबतो आणि आपली माणसं एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही कुठली लोकशाही आहे. लघूशंकेला गेलेल्या आमदारांवरही पाळत ठेवता ही कसली लोकशाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.