Dhananjay Munde Heart Attack : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; सध्या प्रकृती स्थिर

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 13, 2022 | 07:39 IST

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री (Minister of Social Justice) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा (Heart Attack) सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईच्या (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले.

Dhananjay Munde Heart Attack
मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे तातडीने मुंडेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल
  • धनंजय मुंडे हे सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर होते.

Dhananjay Munde : मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री (Minister of Social Justice) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा (Heart Attack) सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईच्या (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात (Intensive care unit) ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) तातडीने मुंडेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

प्रवास करुन थकल्याने अचानक मुंडेंच्या छातीत दुखू लागले होते. त्यातच ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे यांना अस्वस्थ वाटत होते. शेवटी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना स्ट्रोक आल्याचे समजते. धनंजय मुंडे हे सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर होते. जवळपास 06.30 पर्यंत ते त्याच ठिकाणी होते. अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात 07.00 च्या दरम्यान दाखल करण्यात आलं. 

सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. संध्याकाळच्या वेळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

मुंडे यांची प्रकृती स्थिर - आरोग्यमंत्री 

मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात तातडीने पोहचले आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली, धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. 

राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता युवा मोर्चामधून 

धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश करून केली. 2012 मध्ये त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेचे सदस्य करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली पण पंकजा, त्यांची चुलत बहीण आणि गोपीनाथ मुंडे यांची मुलगी यांच्याकडून त्यांना निवडणूकीत अपयशाचा सामना करावा लागला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी