ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 30, 2022 | 08:13 IST

ministers of the Shinde government : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर खातेवाटप जाहीर होईल.

ministers of the Shinde government will take oath in the first week of August 2022
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती
  • महाराष्ट्रातले सरकार केंद्र सरकारच्या मर्जीने स्थापन होणार असे चित्र
  • शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांपैकी किमान १३ ते १६ मंत्री होतील

ministers of the Shinde government will take oath in the first week of August 2022 : मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कार्यरत आहेत. पण सुमारे १२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. ही प्रक्रिया आता लवकरच होणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर खातेवाटप जाहीर होईल.

CM Shinde: मंत्रालयात सत्यनारायण पूजा

महाराष्ट्रातले सरकार केंद्र सरकारच्या मर्जीने स्थापन होणार असे चित्र आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात असल्याचे समजते. भारतीय जनता पार्टीकडे अपक्ष आणि स्वतःचे असे ११३ आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदार आहेत. यामुळे मंत्रिमंडळात पन्नास-पन्नास टक्क्यांचे सूत्र लागू होणार नाही. भाजपचे किती मंत्री असतील याचा आकडा अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही. पण शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांपैकी किमान १३ ते १६ मंत्री होतील असा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Election Ward Reservation: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महापालिकांमधील आरक्षण सोडती फक्त एका क्लिकवर

शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या निवडक अपक्ष आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आणि शिंदे सरकारला पाठिंबा देणारे मंत्री पुन्हा मंत्री होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे एकनाथ शिंदे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे कोणकोणत्या खात्यांची जबाबदारी असेल यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात मंगळवार १ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र का करू नये अशा स्वरुपाचे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. उत्तर देण्यासाठी ७२ तासांचा अवधी दिली होता. नोटीसला आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणते याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थोरला नातू निहार ठाकरे या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या घडामोडींमुळे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सामर्थ्यात आणखी वाढ होईल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतची अनेक माणसं त्यांची साथ सोडतील असा तर्क केला जात आहे. प्रत्यक्षात काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी