Crime News : नायगाव रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, खुनाचे कारण अस्पष्ट

मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नायगाव रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे. या अल्पवयीन मुलीला चाकूने भोसकून तिचा खून करण्यात आला आहे. तसेच तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

minor girl murdered
अल्पवयीन मुलीचा खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • नायगाव रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे.
  • या अल्पवयीन मुलीला चाकूने भोसकून तिचा खून करण्यात आला आहे.

Minor Girl Murder : मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नायगाव रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे. या अल्पवयीन मुलीला चाकूने भोसकून तिचा खून करण्यात आला आहे. तसेच तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  (minor girl dead body found in suitcase near naigaon railway station mumbai)

अधिक वाचा : Ancient Statues : दुष्काळामुळे झालं बुद्धदर्शन! नदीखाली सापडल्या सहा शतकांपूर्वीच्या बुद्धांच्या मूर्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमरास नायगाव रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा नायगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या पुलावर ही बॅग रेल्वे पोलिसांना आढळली होती. या सुटकेसमध्ये एका शाळकरी मुलीचा मृतदेह होता. या मुलीला चाकूने भोसकून ठार करण्यात आले होते. या बॅगमध्ये एक टॉवेल आणि काही कपडेही होते.

अधिक वाचा : सावधान! ‘तुम्ही प्रवेश घेतलेलं विद्यापीठ बनावट नाही ना?, पहिल्यांदा UGC ने जाहीर केली लिस्ट पाहा

मृत मुलीची ओळख पटली असून तिचे नाव वंशिथा कन्हैय्यालाल राठोड आहे. वंशिथा १५ वर्षाची असून अंधेरीच्याच एका शाळेत शिकत होती. वंशिता गुरुवारी सकाळी शाळेसाठी घरातून निघाली होती. परंतु शाळा सुटल्यानंतरही ती घरी पोहोचली नव्हती. तेव्हा वंशिताच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आणि हरवल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी वंशिता अल्पवयीन असल्याने अपहरणाची तक्रार दाखल केली.  

अधिक वाचा : Sonali Phogat: मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर, पार्टीतील CCTV फुटेजमध्ये नेमकं काय?, पाहा VIDEO

वंशिताचे कुणी अपहरण केले होते की ती स्वतःच्या मर्जीनुसार कुठे गेली होती हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांने सांगितले. तसेच तिला ज्या हत्याराने भोसकण्यात आले ते हत्यारही सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

अधिक वाचा : Sonali Phogat: तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट, शरीरावरील जखमांनी तपासाला दिली नवी दिशा

वंशितांचा खून कोणी केला यासाठी पोलीस अंधेरी आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार अहेत. तसेच वंशिताच्या शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी