धमकीमुळे भाजप आमदार गणेश नाईकांचं 27 वर्षाचं प्रेम प्रकरण आलं समोर; 1993 पासून होते लिव्ह इन रिलेशन

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 17, 2022 | 08:11 IST

माझ्यासह १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी गणेश नाईक यांनी दिली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांपासून आमच्या जीवाला धोका आहे, अशी लेखी तक्रार काही दिवसांपूर्वी याच महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात केली होती. त्यावेळेस नेरूळ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून महिलेला २४ तास पोलिस संरक्षण दिले. राज्याच्या महिला आयोगाकडेदेखील संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडूनही नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणी चौकशी करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते.

MLA Ganesh Naik's 27-year love affair in front due to threats
1993 पासून नाईकांचा रंगतोय लव्हशिपचा' किस्सा आता हवा हिस्सा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करावी करण्याचे आदेश
  • गणेश नाईकांचे १९९३ पासून महिलेसोबत प्रेम संबंध
  • संपत्ती हिस्सा मागितल्यानं गणेश नाईकांची महिलेला धमकी

BJP Mla's Love Affair : नवी मुंबई:  नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal Corporation) निवडणुकीच्या (Elections) तोंडावर आल्या असून आरोपांमुळे राजकरण तापलं आहे. राजकारण मोठं तापलं असतानांच भाजपचे आमदार (BJP MLA) गणेश नाईकांच्या (Ganesh Naik) प्रेमप्रकरणाने (Love affair) चर्चांना तडका दिला आहे. एका महिलेनं जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री सीबीडी पोलीस ठाण्यात (CBD police station) गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

माझ्यासह १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी गणेश नाईक यांनी दिली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांपासून आमच्या जीवाला धोका आहे, अशी लेखी तक्रार काही दिवसांपूर्वी याच महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात केली होती. त्यावेळेस नेरूळ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून महिलेला २४ तास पोलिस संरक्षण दिले. राज्याच्या महिला आयोगाकडेदेखील संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडूनही नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणी चौकशी करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मागील २७ वर्ष गणेश नाईकांचं महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीप होते.  27 वर्ष संबंध असल्याचा सदर महिलेने आरोप केला आहे. इतकेच नाहीतर या रिलेशनशीपमधून या महिलेला एका मुलगा झाला आहे. आता मुलाला गणेश नाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला शिवाय त्याला महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप सदर महिलेनं केला आहे. एवढेच नाहीतर मार्ग 2021 मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी गणेश नाईक यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार या महिलेनं दिली आहे. 

पीडित महिलेच्या मतानुसार, आमदारांचे राज्यात चांगलेच वजन असल्यामुळे अनेक वर्षे मला काहीच करता आले नव्हते. परंतु, आता माझा मुलगा मोठा झाला असून त्याच्या भविष्यासाठी त्यालादेखील त्यांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा मिळावा, अशी मागणी केली आहे. त्याला विरोध करत मुलालाही स्वीकारण्यास नाईकांनी नकार दिला आहे.  मार्च २०२१मध्ये आमदार गणेश नाईक यांनी मला सीबीडी रेतीबंदर येथील लखानी टॉवर्ससमोरील इमारतीत बोलावून घेतले. तेथे मी माझ्या मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माझ्यासमोर बंदूक ठेवून मला त्रास देऊ नको, असे सांगत तू शांत राहिली नाहीस, तर मी स्वतःलाही संपवेन आणि तुम्हा दोघांनाही संपवेन, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला, अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. 

दरम्यान महिलेने मुलाला संपत्तीत समान वाटा मिळावा या मागणीचा आग्रह पोलीस व महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत धरला आहे. या प्रकरणावरून विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनीदेखील नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून आमदार गणेश नाईक यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन डीएनए चाचणी करून खऱ्या-खोट्याचा उलगडा करावा, असे म्हटले होते. या महिलेनं नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. परंतु, त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी