आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, नदीच्या पुलावरुन गाडी 30 फूट खोल दरीत कोसळली

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 24, 2022 | 08:23 IST

Jaykumar Gore Accident : पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी 30 फूट खोल दरीत कोसळली. मात्र, दैव बलवत्तर असल्याने जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले.

MLA Jayakumar Gore's car terrible accident
आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे.
  • या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत.
  • पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

Jaykumar Gore Accident News: साताऱ्यातील (satara)मान खटाव मतदार (man Khatav)संघाचे आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्या कारला अपघात (Accident)  झाला. पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी 30 फूट खोल दरीत कोसळली. मात्र, दैव बलवत्तर असल्याने जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत. गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघा गंभीर जखमींना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  (MLA Jayakumar Gore's car terrible accident; car fell from the river bridge)

अधिक वाचा  :  मुंबईत 35 तर महाराष्ट्रात 134 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे.  पहाटे 3 वाजून 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार 30 फूट खोल दरीत कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्यासह गाडीत असलेल्या सर्वांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

अधिक वाचा  : भाग्य दिले तू मला'मध्ये  होणार नव्या खलनायिकेची एन्ट्री 

कोण आहेत गोरे?

जयकुमार गोरे  हे माणचे आमदार आहेत. विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरे यांनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. 2009 मध्ये अपक्ष,  2014 मध्ये काँग्रेस तर 2019 च्या निवडणुकीत भाजपमधून विजयी होऊन गोरे यांनी यशाची हॅट्ट्रिक साधली. माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करुन राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी