Ravi Rana : शब्द मागे घेत रवी राणा यांनी व्यक्त केली दिलगिरी, बच्चू कडू यांना केले हे आवाहन

Ravi Rana : बच्चू कडू जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांनी खोके घेतले होते असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

ravi rana
रवी राणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बच्चू कडू जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांनी खोके घेतले होते असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता.
  • आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे.
  • राणा यांनी शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Ravi Rana : मुंबई : बच्चू कडू जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांनी खोके घेतले होते असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच बच्चू कडू यांनाही राणा यांनी आवाहन केले आहे. (mla ravi rana regret over criticized mla bachchu kadu khoka statement after cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis meeting)

अधिक वाचा : बच्चू कडू-रवी राणा वाद मिटला? तब्बल अडीच तास बैठकीनंतर राणा म्हणाले हम साथ साथ है,हम दोस्त है'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीनंतर राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणा म्हणाले की, गेल्या दहा दिवसांत अनेक वाद झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही माझे नेते आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आमची साडे तीन तास बैठक पार पडली. आमच्यात जे न पटणारे मुद्दे होते, त्यावर चर्चा झाली. अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू आणि आम्ही दोघेही आमदार आहोत. आम्ही दोघे सरकारसोबत आहोत. शिंदे फडणवीस सरकारमधील सर्व आमदार हे माझे सहकारी आहेत. जर माझ्या बोलण्याने कुणीही दुखावले असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगीरी व्यक्त करतो असे राणा म्हणाले. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा जनतेची कुठलीच कामे झाली नाहीत. अशा वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे उत्तम काम करत आहे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते, परंतु आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शेताच्या बांधावर जात आहेत आणि शेतकर्‍यांचे म्हणने ऐकून घेत आहेत. अशा वेळी सत्ताधारी आमदारांमध्येच वाद नको. आम्हाला मिळून महाराष्ट्राचा विकास घडवायचा आहे, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो असे राणा म्हणतो. तसेच या आमच्या वादात विरोधक आपली राजकीय पोळी भाजत आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे, त्यामुळेच मी दिलगिरी व्यक्त करतो असे राणा म्हणाले. 

अधिक वाचा : Bachchu Kadu : रवी राणामुळे आपण सरकारवर नाराज, आमदार बच्चू कडू यांचा आंदोलनाचा इशारा

बच्चू कडू यांना आवाहन

बच्चू कडू यांच्यावर मी टीका केली तेव्हा कडू यांनीही खालच्या शब्दात टीका केली, त्यामुळे त्यांनीही मोठ्या मनाने शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त करावी असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे. मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो असे विधान कडू यांनी केले होते. हे वाक्यसुद्धा न पचणारे होते. कडू यांनीही खालच्या शब्दात टीका केली होती. बच्चू कडूही आपले शब्द मागे घेतील आणि दिलगीरी व्यक्त करतील. आम्ही संपूर्ण ताकदीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उभे आहोत. या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. कधी कधी दोन पावलं मागे घ्यायची असतात आणि पुढे जायचे असते असेही राणा यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी