आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? ट्विटरवर उद्धव ठाकरे यांचा “महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख” म्हणून उल्लेख

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 13, 2022 | 06:59 IST

एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) हे आता उद्धव ठाकरेंकडे परतील असे संकेत मिळत आहेत. कारण असा प्रश्न उपस्थित होण्यामागे कारण आहे त्यांनी केलेलं एक ट्विट.

MLA Sanjay Shirsat on the way back?
आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंच्या या भाषणाचा संदर्भ शिरसाट यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही याच्याशी लावला जात आहे.
  • काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलिटही केलं.
  • मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी हे ट्विट केलेलं नाही. मंत्रीपदासाठी मी भुकेलेलो लोक नाही. -शिरसाट

मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) हे आता उद्धव ठाकरेंकडे परतील असे संकेत मिळत आहेत. कारण असा प्रश्न उपस्थित होण्यामागे कारण आहे त्यांनी केलेलं एक ट्विट. या ट्विटने राज्याचे राजकारण पुन्हा हादरवून सोडलेलं आहे. संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट (Tweet) मधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या या भाषणाचा संदर्भ शिरसाट यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही याच्याशी लावला जात आहे. ट्विटमधील व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे बोलत असून ते म्हणतात की, दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच. तर संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलिटही केलं.

संजय शिरसाठ यांची ट्विटनंतरची प्रतिक्रिया 

या ट्विटबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, मी जे ट्विट केलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठीमागे एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली होती. आजही माझं असं मत आहे जर तुम्ही कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावत असाल त्यावेळी मग तुम्ही कुटुंबाचं असलेलं मत कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या मतावर नाही तर कुटुंबाच्या मताबद्दल विचार केला पाहिजे होता.

Read Also : शरद मरकडला शेतकऱ्यांनी दिलं स्पेशल गिफ्

कुटुंबाच्या मताला तुम्ही मान दिला पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ होता. मी ट्विट केलं याचा अर्थ कुटुंबप्रमुख ते राहिले असते, आम्ही नेहमीच त्यांना कुटुंब प्रमुख मानत आलो, परंतु त्यांनी आमचं त्या वेळेला ऐकलं नाही आणि आजची जी अवस्था झाली त्याबद्दल आम्हालाही खेद वाटतोय, असे शिरसाट म्हणाले.

मंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी हे ट्विट केलेलं नाही. मंत्रीपदासाठी मी भुकेलेलो लोक नाही. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये मी प्रत्येक वेळेला माझं स्पष्ट मत मांडलं आहे. मला योग्य वाटतं ते मी बोलतो आणि बोलताना मी त्यांनी आपला विचार थोडा बदलावा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ नये, हीच भूमिका मी पहिल्यापासून मांडत आलोय आणि आजही मी त्या भूमिकेपासून मागे फिरणार नाही, मला मंत्रिपद मिळालं, नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधी येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

Read Also : चंदीगडमधील एका ४० वर्षीय महिलेची अनोखी लवस्टोरी

एकनाथ शिंदे हे सुद्धा कायम त्यांची साथ सोडा हीच भूमिका मांडत आले आहेत, आपण शिवसेना-भाजप बरोबर युती करून निवडून आलेलो आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या सोबत बसू शकत नाही, आमदार नाराज आहेत. आमदारांची काम होत नाहीत, हीच आमची भूमिका होती आणि कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यासमोर हेच मांडत होतो, त्यात काही आम्ही चूकीचं करत नव्हतो ना? अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि हे ट्विट डिलीट केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी