मुंबई: राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) इशाऱ्यानंतर मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील घाटकोपर आणि कांदिवली भागात मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण केले. खरे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली होती. मशिदींचे लाऊडस्पीकर बंद करा नाहीतर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असे राज ठाकरे म्हणाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.