उद्धव ठाकरे हिंदू आहेत म्हणून हनुमान चालिसावर बंदी घालताहेत - मनसेची पोस्टरबाजी

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 06, 2022 | 13:45 IST

मशिदींवरील (mosque) भोंगा अन् हनुमान चालिसामुळे (Hanuman Chalisa) राज्यात कल्लोळ माजवणारी राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसेनं आता परत मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकेचा बाण सोडत शिवसेनेला घायाळ केलं आहे. अजानसाठी मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर विरोधात मनसेने म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं युद्ध पुकारलं आहे.

MNS banner attack
शिवसेना कार्यालयासमोर पोस्टर लावत उद्धव ठाकरेंवर मनसेची टीका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेला आपला हिंदुत्वाची विचारधारा बोथट करावी लागली आहे.
  • उद्धव ठाकरेंच्या बोथट झालेल्या हिंदुत्वावर टीका
  • बाळासाहेबांचा ठाकरे बाणा आणि वारसा राज ठाकरे जपत आहेत - मनसे

मुंबई  :   मशिदींवरील (mosque) भोंगा अन् हनुमान चालिसामुळे (Hanuman Chalisa) राज्यात कल्लोळ माजवणारी राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसेनं आता परत मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकेचा बाण सोडत शिवसेनेला घायाळ केलं आहे. अजानसाठी मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर विरोधात मनसेने म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं युद्ध पुकारलं आहे. या युद्धात मनसेनं शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर पोस्टर लावत उद्धव ठाकरेंच्या बोथट झालेल्या हिंदुत्वावर टीका केली आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांचा ठाकरे बाणा आणि वारसा राज ठाकरे कसा जपत आहेत हे सांगितलं आहे. 

दरम्यान, जेथे अजानसाठी लाऊडस्पीकर वाजेल तेथे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा असा आदेश राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली, परंतु राज्यातील पोलीस कर्मचारी मनसे कार्यकर्त्यांना पकडून लाऊडस्पीकर उतरविण्यास भाग पाडत आहेत. यावरुन मनसेनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात बॅनर लावत शिवसेनेसमोर हिंदुत्वाचा भोंगा वाजवला आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार चालू आहे. यात मात्र शिवसेनेला आपला हिंदुत्वाची विचारधारा बोथट करावी लागली आहे. हाच मुद्दा मनसेला पटत नसल्याचं दिसून येत आहे. सेनेचा बोथट झालेला हिंदुत्वावरुन मनसेनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. कारण ठाकरे सरकारने हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पकडत लाऊडस्पीकर काढण्यास भाग पाडत आहे. याचा विरोध म्हणून मनसेनं शिवसेनेच्या कार्यलयासमोर पोस्टर लावत सेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न केला आहे. मनसेनं लावलेल्या पोस्टवर लिहिण्यात आले आहे की, बाळासाहेब पहा, तुमचा मुलगा हिंदू असल्याने मंदिरातील लाऊडस्पीकर काढतोय. आणि हनुमान चालिसा बंद पाडत आहे. 

भाजपनेही केली टीका 

यापूर्वी भाजपनेही या मुद्द्यावरून उद्धव सरकारला घेरले आहे. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की, शिवसेना स्वतःला मंदिरांचे रखवालदार समजते, , त्याच शिवसेनेचे आणखी एक रूप आता महाराष्ट्रातील जनतेसमोर आले  आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने केवळ सरकारमध्ये राहण्यासाठी असे निर्णय घेत आहेत, ते जनता चिंतनशील नजरेने पाहत आहे आणि येत्या काळात त्यांना त्याचे उत्तर नक्कीच मिळेल. 

तज्ञ काय म्हणतात

दरम्यान राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली होती. यातून अनेक तर्क विर्तक काढण्यात आली होती. राज्यात शिवसेना कट्टर हिंदुत्व धारणेचा पक्ष असल्याचं मानलं जात होतं. आता त्याच पातळीवर मनसेवर सादर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. शिवसेनेच्या जागीवर जनतेला मनसेचा पर्याय उपलब्ध करायचा आणि सेनेला एक कडक टक्कर देणार पक्ष उभा करायचा असा प्लान भाजपकडून आखला जात आहे.  शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी नवीन पक्ष स्थापित केला परंतु राज ठाकरेंना हवे तसे यश मिळालेले नाही. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी