Raj Thackeray : मनसेची महाआरती रद्द, राज ठाकरेंनी दिले आदेश, उद्या ट्विटवर करणार भूमिका स्पष्ट

उद्या ईद आणि अक्षय तृतीया असे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माणच्या सैनिकांनी सगळीकडे महाआरत्यांचे आयोजन करावे असा आदेश यापूर्वी राज ठाकरे यांनी दिला होता. आता राज ठाकरे यांनी हा आदेश मागे घेतला असून राज्यात शांतता आणि सौहार्देचे वातावरण असावे अशी भूमिका घेतली आहे. कुणाच्याही सण, समारंभात बाधा आणायची नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

raj thackeray
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र नवनिर्माणच्या सैनिकांनी सगळीकडे महाआरत्यांचे आयोजन करावे असा आदेश यापूर्वी राज ठाकरे यांनी दिला होता.
  • आता राज ठाकरे यांनी हा आदेश मागे घेतला असून राज्यात शांतता आणि सौहार्देचे वातावरण असावे अशी भूमिका घेतली आहे.
  • कुणाच्याही सण, समारंभात बाधा आणायची नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

Raj Thackeray : मुंबई : उद्या ईद आणि अक्षय तृतीया असे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माणच्या सैनिकांनी सगळीकडे महाआरत्यांचे आयोजन करावे असा आदेश यापूर्वी राज ठाकरे यांनी दिला होता. आता राज ठाकरे यांनी हा आदेश मागे घेतला असून राज्यात शांतता आणि सौहार्देचे वातावरण असावे अशी भूमिका घेतली आहे. कुणाच्याही सण, समारंभात बाधा आणायची नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

 

महाराष्ट्र सैनिकांसाठी...

Posted by Raj Thackeray on Monday, May 2, 2022

सोशल मीडियावर पोस्ट लिहून राज ठाकरे म्हणाले की, उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.”

राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये प्रक्षोभक विधान

रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पाडली. यावेळी राज ठाकरे यांनी  मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजे या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच हा प्रश्न जर सुटत नसेल तर जे काय व्हायचे ते होऊन जाऊदे असे प्रक्षोभक विधानही केले. या वेळी राज ठाकरे यांनी पुन्हा ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला. तसेच हे करण्यासाठी दोन हात करायला मागे पुढे पाहू नका असे आदेशही राज ठाकरे यांनी यावेळी दिले. 

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतरच महाराष्ट्रात जाती जातींमध्ये विद्वेष निर्माण केला. बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण समाजाचे होते म्हणून शरद पवार यांनी त्रास दिला. शरद पवार यांना हिंदू शब्दाशी ऍलर्जी आहे, ते कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, इतकेच नाही तर पवार हे नास्तिक आहे अशी माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दिली आहे असेही राज ठाकरे म्हणाले. 
सभे दरम्यान अझान सुरू झाली तेव्हा राज ठाकरे यांनी पोलिसांना विनंती करून ही अझान बंद करण्याची विनंती केली. तसेच अझान म्हणणार्‍यांच्या तोंडात बोळा घालावा. हे जर असेच ऐकत नसतील तर जे काय व्हायचे ते होऊन जाऊदे असे प्रक्षोभक विधान राज ठाकरे यांनी केले. तसेच ही अझान आता बंद झाली नाही तर त्यानंतर काय होईल त्यासाठी आपण जबाबदार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी