मनसे प्रमुख राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 23, 2021 | 21:04 IST

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरेंची आई तसेच त्यांच्या बहिणीलाही कोरोना झाला आहे.

MNS Chief Raj Thackeray Corona Positive
मनसे प्रमुख राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • मनसे प्रमुख राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
  • राज ठाकरेंची आई तसेच त्यांच्या बहिणीलाही कोरोना झाला
  • लक्षणे सौम्य स्वरुपाची

मुंबईः मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरेंची आई तसेच त्यांच्या बहिणीलाही कोरोना झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला असला तरी आतापर्यंत आढळलेली लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. MNS Chief Raj Thackeray Corona Positive

राज ठाकरे आणि त्यांच्या आईने कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले होते. राज ठाकरेंच्या आई तर आज (शनिवार २३ ऑक्टोबर २०२१) सकाळी मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्या होत्या. सध्या राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांना होम क्वारंटाइन करुन त्यांचे उपचार सुरू करण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बरे झाल्यानंतर आणि डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच राज ठाकरे पुन्हा कामकाज सुरू करतील, असे मनसेकडून जाहीर करण्यात आले.

कोरोना संकट सुरू असताना राज ठाकरे अनकेदा विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरत होते. हे वर्तन त्यांना कोरोना होण्यासाठी कारणीभूत ठरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तज्ज्ञांचे आवाहन

लस घेतली तरी मास्क वापरण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून वारंवार केले जात आहे. कोरोनाचे वेगवेगळे विषाणू सक्रीय आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेते फरक असतो. यामुळे लसचे दोन्ही डोस घेतले तरी मास्क काढू नका असे आवाहन तज्ज्ञ सातत्याने करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी