Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका, राज ठाकरे यांची कोश्यारींवर टीका

गुजराती आणि राजस्थानी लोकांमुळे मुंबई आर्थिक राजधानी झाली असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते. कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. महाराष्ट्राबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच मराठी माणसाला डिवचू नका अस इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

raj thackeray
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • गुजराती आणि राजस्थानी लोकांमुळे मुंबई आर्थिक राजधानी झाली असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते.
  • कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
  • महाराष्ट्राबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

Bhagat Singh Koshyari : मुंबई :  गुजराती (Gujrati Community) आणि राजस्थानी (Rajsthani Community) लोकांमुळे मुंबई (Mumbai) आर्थिक राजधानी (Financial Capital) झाली असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले होते. कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. महाराष्ट्राबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. तसेच मराठी माणसाला (Marathi Manus) डिवचू नका अस इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. (mns chief raj thackeray criticized governor bhagat sinh koshyari over mumbai remark)

अधिक वाचा : मोबाईलकडे बघताना साडेतीन वर्षांच्या मुलीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू 

राज ठाकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कोश्यारीची होशियारी? आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र!

 

अधिक वाचा : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती

नितेश राणेंकडून समर्थ

सर्व स्तरातून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका होत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी कोश्यारी यांचे समर्थ केले आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे की मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना मुंबई महानगरपालिकेची कंत्राट दिली?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहिजे असतात. तसेच एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ?? असा सवालही राणे यांनी विचारला आहे. 

अधिक वाचा : Mumbai Crime : गोवंडीत लहान मुलांना विषप्रयोग करून दाम्पत्याची आत्महत्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी