Raj Thackeray : ज्या मशीदींसमोरील भोंगे निघत नाहीत तिथे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा - राज ठाकरे

गुढी पाडव्यानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळावा घेण्यात आला आहे. राज ठाकरे आज काय बोलणार आणि काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Raj Thackeray
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL

Raj Thackeray :मुंबई :गुढी पाडव्यानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळावा घेण्यात आला आहे. राज ठाकरे आज काय बोलणार आणि काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरून Live

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरून Live

Posted by Times Now Marathi on Saturday, April 2, 2022
 • आज कार्यकर्त्यांचे दर्शन घेऊन आनंद वाटला
 • कोरोनाचा काळ आठवून आनंदही वाटतो आणि त्रासही होतो.
 • आज गजबजलेले शिवतीर्थ कोरोनाकाळात सामसुम होतं.
 • या काळात संपूर्ण जग सामसुम होतं.
 • या काळात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 
 • या दोन वर्षात खूप काही बोलायचे राहून गेलं 
 • निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.
 • अमित शहा म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.
 • निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. 
 • राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
 • माध्यमांची पकपक सुरू होते, दररोज नव्या बातम्यांचा भडिमार
 • मतदारांच्या स्मरणशक्तीचा शिवसेनेने गैरफायदा घेतला.
 • छगन भुजबळ दोन ते अडीच वर्ष तुरुंगात होते, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 
 • दाऊदची संबंध असलेल्या नवाब मलिक यांना मंत्रिपद, मतदारांचा वापर मेंढपाळासारखा
 • लोकशाही कशी असते हे इंग्लंडकडे पहा
 • महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो- राज ठाकरे 
 • जो जो माणून इतिहास विसरला त्याच्या पायाखालील भुगोल हरवला.
 • योगींच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये विकास होत आहे, राज ठाकरे यांच्याकडून भाजपची प्रशंसा
 • राज्यात आजही शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
 • राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले.
 • शरद पवारांना जातीचे राजकारण हवंय
 • बाबासाहेब पुरंदेर यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आले.
 • आम्ही जातीतून बाहेर नाही पडलो आम्ही काय हिंदू होणार?
 • जातींमधून बाहेर या तरच हिंदुत्वाचा ध्वज हाती घेता येईल.
 • प्रत्येक राज्याने आपापली संस्कृती जपल्यास हा देश मोठा होणार आणि त्यातून हिंदू मोठा होणार.
 • ज्यांनी काम नाही केले, त्यांना सत्तेवर बसवले, ज्यांनी काम केले त्यांना सत्तेबाहेर काढले. 
 • १९९५ मध्ये फुकट घर मिळणार या उद्देशाने लोंढे वाढले.
 • बाळासाहेब ठाकरे यांचा उद्देश चांगला होता.
 • आमदारांना घरे देण्यास मनसे आमदार राजु पाटील यांनी विरोध केला.
 • आमदार, खासदारांना मिळणारी पेंशन बंद झाली पाहिजे
 • शिवसेना नेता यशवंत जाधव यांच्या घरात धाड पडली, दोन दिवस काय मोजत होते?
 • ज्या मशीदींसमोरील भोंगे निघत नाहीत तिथे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा 
 • सत्ताधार्‍यांसमोर लोटांगण घालणारा समाज नको, मला अरेला कारे म्हणणारे लोक हवेत.
 • बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे स्मारक बांधा
 • तुम्हाला बंगला आवडला म्हणून नावावर करुन घेऊन नका
 • मदरशांवर एक धाड टाका
 • शिवजयंती साजरी केली तशीच १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही जयंती साजरी करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी