Raj Thackery meet Devendra Fadnavis : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 'चाय पे चर्चा', मुंबईत भाजप-मनसे युतीची चर्चा जोरात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 29, 2022 | 13:31 IST

MNS Chief Raj Thackery meet Dy CM of Maharashtra Devendra Fadnavis at Sagar Bunglow Mumbai : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर ही भेट झाली.

MNS Chief Raj Thackery meet Dy CM of Maharashtra Devendra Fadnavis
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 'चाय पे चर्चा'  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 'चाय पे चर्चा'
  • मुंबईत भाजप-मनसे युतीची चर्चा जोरात
  • मुंबईत फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर ही भेट झाली

MNS Chief Raj Thackery meet Dy CM of Maharashtra Devendra Fadnavis at Sagar Bunglow Mumbai : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर ही भेट झाली. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज यांच्याशी बातचीत केली होती. आता राज यांनी फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे. अद्याप चर्चेविषयी सविस्तर माहिती प्रसिद्ध झालेली नाही. पण राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चेसाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. भेटीविषयी अद्याप दोन्ही नेत्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राजकीय पेच निर्माण झाल्यास एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार मनसेमध्ये प्रवेश करतील असा अंदाज काही राजकीय पंडीत व्यक्त करत आहेत. या शक्यतेबाबतही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नातू झाल्यामुळे आनंदात असलेले राज ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थ या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करणार आहेत. या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण याबाबतही अधिकृतरित्या दोन्ही नेत्यांकडून माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी मध्यंतरी हिंदुत्व हा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. पण त्यांनी मराठी भाषेचा आणि भूमीपुत्रांचा मुद्दा सोडलेला नाही. यामुळे मनसे काही मुद्यांवर टप्प्याटप्प्याने समतोल साधत भाजपशी युती करण्याबाबत चाचपणी करत असल्याचीही चर्चा आहे,

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी