मशिदींवर भोंगे 'जैसे थे', मनसेच्या 'हनुमान चालीसा'वर पोलीस कारवाई

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 03, 2022 | 18:30 IST

MNS leader Mahendra Bhanushali taken into police custody after playing 'Hanuman Chalisa' on loudspeakers without permission : मशिदींवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई झालेली नाही. पण मनसेने सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' पठण सुरू केले म्हणून कारवाई झाली.

MNS leader Mahendra Bhanushali taken into police custody after playing 'Hanuman Chalisa' on loudspeakers without permission
मशिदींवर भोंगे 'जैसे थे', मनसेच्या 'हनुमान चालीसा'वर पोलीस कारवाई 
थोडं पण कामाचं
  • मशिदींवर भोंगे 'जैसे थे', मनसेच्या 'हनुमान चालीसा'वर पोलीस कारवाई
  • मुंबईत घाटकोपर येथे पोलिसांनी मनसेचे लाऊडस्पीकर काढले
  • लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक

MNS leader Mahendra Bhanushali taken into police custody after playing 'Hanuman Chalisa' on loudspeakers without permission : मुंबई : मशिदींवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई झालेली नाही. पण मनसेने सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' पठण सुरू केले म्हणून कारवाई झाली. मुंबईत घाटकोपर येथे पोलिसांनी मनसेचे लाऊडस्पीकर काढले. तसेच लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली.

लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावण्यासाठी परवानगी घेतली नाही, असे सांगत पोलिसांनी कारवाई केली. तसेच लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावल्याप्रकरणी मनसेच्या महेंद्र भानुशाली यांना अटक करण्यात आली. 

कोणत्याही परिस्थितीत लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावू नये यासाठी पोलिसांनी 'अँम्प्लिफायर' (amplifier) ताब्यात घेतले असे अटक होत असताना मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी सांगितले. पोलीस कारवाई झाली तरी लवकरच सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'जय श्रीराम' ऐकवणार असे महेंद्र भानुशाली म्हणाले. 

याआधी मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावू असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या सभेत दिला होता. हा इशारा प्रत्यक्षात आणण्याचे काम महेंद्र भानुशाली यांनी केले होते. त्यांनी घाटकोपरमध्ये सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' पठण सुरू केले होते. 

देशातील अनेक कोर्टांनी मशिदींवरील अजान ऐकविणारे भोंगे बेकायदेशीर असून ते हटवावे अशा स्वरुपाचे निर्णय दिले आहेत. भोग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते हे पण एक कारण दिले जाते. पण आजही अनेक मशिदींवर भोंगे अर्थात लाऊडस्पीकर आणि स्पीकर कायम आहेत. या भोंग्यांवरून दररोज पाच वेळा अजान ऐकवली जाते. उघडपणे हा बेकायदा प्रकार सुरू आहे पण या विरोधात अद्याप कारवाई झालेली नाही. मुंबईच्या पूर्व उपनगारत घाटकोपरमध्येही हीच स्थिती आहे. या प्रकाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत मनसेच्यावतीने महेंद्र भानुशाली यांनी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' पठण सुरू केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी