मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 06, 2022 | 15:45 IST

new address of mantralaya was formerly Krishnakunj and now Shivteerth : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट व्हायरल होत आहे.

mns leader sandeep deshpande tweet goes viral
मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ 
थोडं पण कामाचं
  • मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ
  • मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्वीट व्हायरल
  • ट्वीटमधून शिवसेनेवर बोचरी टीका केल्याची चर्चा

mns leader sandeep deshpande tweet goes viral : मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट व्हायरल होत आहे. '...म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे' ( new address of mantralaya was formerly Krishnakunj and now Shivteerth ) असे वाक्य टाइप करुन त्याच्यासोबत संदीप देशपांडे यांनी एक चित्र ट्वीट केले आहे. या चित्रात सहाव्या मजल्यावर कुलुप लावलेला दरवाजा दिसत आहे. पहिल्या चित्रातले वर्ष २०२० आहे तर दुसऱ्या चित्रातले वर्ष २०२१ आणि तिसऱ्या चित्रातले वर्ष २०२२ आहे. दुसऱ्या चित्रात दरवाजावर कोळीष्टके दिसत आहेत. तिसऱ्या चित्रात कोळीष्टकांचे प्रमाण वाढले आहे. हे ट्वीट अनेकांनी रीट्वीट आणि लाइक केले आहे. काही जणांनी ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे मागील काही दिवसांपासून उपचार घेत आहेत. डिसेंबर महिन्यात त्यांच्या मानेवर एक ऑपरेशन झाले. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री अनुपस्थित होते. महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून दीर्घ काळ मुख्यमंत्री 'वर्क फ्रॉम होम' आहेत. ते मंत्रालयात दिसत नाहीत. या घटनांचा संदर्भ घेऊन संदीप देशपांडे यांनी ट्वीट केल्याची चर्चा सुरू आहे.  

कोरोना संकटाच्या काळाता मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते सक्रीय दिसले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे जास्त जागा मिळवेल आणि मुख्यमंत्री पदावर दावा सांगेल; असे सूतोवाच करणारे हे ट्वीट म्हणजे शिवसेनेवर केलेली बोचरी टीका असल्याची पण चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी