MNS : राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, मुस्लिम पदाधिकार्‍याचा राजीनामा

गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी राज्यातील मशीदींवर धाडी घाला असे विधान केले होते. तसेच मशीदींवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच काही मुस्लिम पदाधिकार्‍यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. 

raj thackeray
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी राज्यातील मशीदींवर धाडी घाला असे विधान केले होते.
  • राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
  • तसेच काही मुस्लिम पदाधिकार्‍यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. 

Raj Thackeray : मुंबई :  गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी राज्यातील मशीदींवर धाडी घाला असे विधान केले होते. तसेच मशीदींवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असे म्हटले होते. यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. राज ठाकरे यांच्या भूमिकेनुसार घाटकोपर आणि कांदिवलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशीदींसमोर हनुमान चालीसा लावले होते. परंतु राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच काही मुस्लिम पदाधिकार्‍यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. 

पुण्यातील मनसेचे शाखा अध्यक्ष माजिद शेख यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत धार्मिक भेदभाव सुरू झाल्याने आपण राजीनामा दिल्याचे शेख यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. शेख म्हणाले की राज ठाकरे पूर्वी राज्याच्या विकासाचा मुद्दा मांडायचे, परंतु आता आपल्या राजकारणासाठी राज ठाकरे जाती, धर्मात तेढ निर्माण करत असल्याची शेख म्हणाले आहेत.  


नगरसेवकांचा वैचारिक गोंधळ

पुण्यात मनसेचे दोन नगरसेवक आहेत. त्यापैकी नगरसेवक वसंत मोरे यांनी आपला वैचारिक गोंधळ झाल्याचे म्हटले आहे. राज साहेबांच्या भाषणानंतर आपल्याला मुस्लिम भागातून अनेक फोन आले तुम्ही स्पीकर लावणार का अशी विचारणा आपल्याला केल्याचे मोरे यांनी केले. तसेच आपल्या मतदारसंघात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदान राहतात, त्यामुळे जाती धर्मांत तेढ निर्माण होईल आपण असे कुठलेही काम करणार नाही असे मोरे म्हणाले. असे असले तरी आपण राज ठाकरे यांच्यावर बिल्कूल नाराज नाही, गेली १५ वर्षांहून अधिक आपण त्यांच्यासोबत काम करत असल्याचेही मोरे यांनी सांगितले. फक्त आपला वैचारिक गोंधळ झाल्याचे मोरे यांनी म्हटले. 

ठाण्यात होणार राज ठाकरे यांची सभा

९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यात मनसेचा कार्यकर्ता मेळावा झाला होता. तेव्हा झालेल्या भाषणात हा फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर मुंबईत गुढीपाडव्याला असेल असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार गुढीपाडव्याला दादरच्या शिवाजी महाराज पार्कात मनसेचा मेळावा पार पाडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेची भाजपसोबत युती झाली असताना शिवसेने दगा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली असा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जातीयवाद वाढला, शरद पवार यांना जातीयवादाचे राजकारण हवे असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्यातील मदरशांची एकदा तपासणी करा आणि मशीदीवरील भोंगे हटवा अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपर आणि कांदिवलीत मशीदीसमोर हनुमान चालीसा लावली होती. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी