Raj Thackeray: टोल वरील आंदोलन, फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन आणि आता भोंग्यांवरील मनसेच्या आंदोलनाचाही फज्जा ? काय आहे ग्राऊंड रीऍलिटी

मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज्यात अनेक ठिकाणी अझानचा आवाज कमी झाला, तुरळक ठिकाणी भोंगेही उतरवण्यात आले, परंतु मनसेला अपेक्षित या आंदोलनाला खरच यश आले का? की टोलविरोधात केलेले आंदोलन, बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाप्रमाणे या आंदोलनाचाही फज्जा उडाला आहे का? जाणून घेऊया ग्राऊंड रीऍलिटी.

raj thackeray
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
  • राज्यात अनेक ठिकाणी अझानचा आवाज कमी झाला, तुरळक ठिकाणी भोंगेही उतरवण्यात आले,
  • परंतु मनसेला अपेक्षित या आंदोलनाला खरच यश आले का?

Raj Thackeray Hanuman Chalisa Row : मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज्यात अनेक ठिकाणी अझानचा आवाज कमी झाला, तुरळक ठिकाणी भोंगेही उतरवण्यात आले परंतु मनसेला अपेक्षित या आंदोलनाला खरच यश आले का? की टोलविरोधात केलेले आंदोलन, बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाप्रमाणे या आंदोलनाचाही फज्जा उडाला आहे का? जाणून घेऊया ग्राऊंड रीऍलिटी.

मुंबईच्या गुढी पाढव्या निमित्त घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच राज्यातील मशिदींवर अनधिकृत भोंगे आहेत त्यांचा इतर सामान्य माणसांना त्रास होतो. त्यामुळे हे भोंगे उतरवले पाहिजे अन्यथा मशींदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यात एकच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ठाणे आणि औरंगाबादमध्ये झालेल्या सभेतही राज ठाकरे यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार करत ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता. तर ३ मे रोजी राज्यभरात महाआरत्या करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले होते. नंतर ३ मे रोजी ईद योग्य पध्दतीन साजरी व्हावी, कुणाच्याही सण संमारंभात अडथळा नको अशी भूमिका घेत महाआरती न करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून दिले. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली म्हणून त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

४ मे रोजी अनेक प्रार्थनास्थळांवर डेसिबलच्या मर्यादेत अझान केली गेली. फक्त मुस्लिम प्रार्थनास्थळातच नव्हे तर हिंदू मंदिरातील होणारी काकड आरतीही झाली नाही. शिर्डीतील पहाटेची काकड आरती आणि शेजारती लाऊडस्पीकरवर करण्यात आलीच नाही. काही मुस्लिम बांधवांनी अझान बंद करू परंतु साई मंदिरातील काकड आरती लाऊडस्पीकरवर व्हावी अशी मागणीही केली होती. 

महाराष्ट्रातल्या बहुतांश ठिकाणी मनसेच्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गाडीतून पळ काढला. आणि या झटापटीत एक महिला पोलीस खाली पडल्या. नंतर संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ जारी करून आपण पळून गेलोच नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू नये म्हणून आपण दुसरीकडे आलो असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. 

या सगळ्यात राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. अनेक ठिकाणी शांता राखण्यात पोलिसांना यश आले. काही मशिदींवरील मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन भोंगे उतरवले. परंतु मनसेला या आंदोलनातून काही खास गवसले असे चित्र नाही. टोल विरोधात केलेल्या आंदोलन आणि फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनासारखा या आंदोलनाचाही फज्जा उडाला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांत उमटली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, असे विश्लेषण काही राजकीय विश्लेषकांनी केल आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी